For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खासदार सदानंद तानावडे यांच्या भूमिकेचे मंत्री सिक्वेरांकडून स्वागत

03:26 PM Dec 11, 2023 IST | Tarun Bharat Portal
खासदार सदानंद तानावडे यांच्या भूमिकेचे मंत्री सिक्वेरांकडून स्वागत
Advertisement

गोव्यातील पासपोर्ट प्रकरण

Advertisement

मडगांव : गोव्यातील पासपोर्ट प्रकरणावर राज्यसभा खासदार सदानंद तानावडे यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचे पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी स्वागत केले आहे.  तानावडे यांनी गोव्यातील असंख्य व्यक्तींना प्रभावित करणाऱ्या गंभीर समस्येकडे लक्ष वेधल्याचे सिक्वेरा यांनी म्हटले आहे. प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने पोर्तुगालमध्ये ज्यांच्या जन्माची नोंदणी केल्यानंतर त्यांच्या भारतीय पासपोर्टचे नूतनीकरण केल्यानंतर 70 हून अधिक लोकांचे पासपोर्ट रद्द केल्याने चिंता वाढली आहे. पोर्तुगालमधील जन्म नोंदणी ही नागरिकत्व मिळविण्याची प्रभावी तारीख मानून पासपोर्ट रद्द करण्याचा आधार आहे. केवळ पोर्तुगालमधील जन्म नोंदणीवर आधारित भारतीय पासपोर्ट रद्द करण्याच्या अनुचित प्रकारावर भर देत राज्यसभा खासदार तानावडे यांनी परराष्ट्र व्यवहारमंत्र्यांना याबाबत पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे.

तानावडे यांनी या व्यक्तींना पोर्तुगीज सरकारकडून अधिकृत नागरिकत्व दस्तऐवज मिळेपर्यंत भारतीय पासपोर्टचे नूतनीकरण करण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव मंत्रालयाला दिला आहे. त्यांच्या प्रवासाची सोय करण्यासाठी आणि त्यांचे पोर्तुगीज पासपोर्ट तयार होईपर्यंत संक्रमण कालावधीत त्यांचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी हा उपाय महत्त्वपूर्ण आहे. याव्यतिरिक्त, पोर्तुगीज नागरिकत्व प्राप्त केल्यावर त्वरित ‘ओसीआय’ कार्ड जारी करण्याची सूचना केली आहे. आपल्या अनेक घटकांसाठी हा उपक्रम विशेष महत्त्वाचा आहे, विशेषत: आपल्या नुवे मतदारसंघातील जे चांगल्या संधींसाठी पोर्तुगीज पासपोर्टसाठी अर्ज करतात परंतु प्रक्रियेत अनेकदा विलंब होतो. तानावडे यांच्या कृतीबद्दल आपण घटक पक्षांच्या वतीने राज्यसभा खासदारांचे कौतुक करतो. आपणास आशा आहे की, परराष्ट्र मंत्रालय सर्व संबंधितांच्या फायद्यासाठी हे प्रकरण त्वरित सोडविणार, असे मंत्री सिक्वेरा यांनी म्हटले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.