महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

खासदार सदानंद तानावडे यांनी घेतली भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांची भेट

12:44 PM Dec 05, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पक्षाचा विस्तार करण्याविषयी दोन्ही नेत्यांत चर्चा

Advertisement

पणजी : राज्यसभा खासदार तसेच गोवा प्रदेश भाजपा अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांची भेट घेऊन मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि राजस्थानमधील निवडणुकांमध्ये पक्षाने मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन केले. यावेळी नड्डा यांचे नेतृत्व व प्रचारकार्यातील त्यांचा महत्त्वाचा सहभाग या दोन्ही घटकांनी भाजपाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलल्याचे मत तानावडे यांनी व्यक्त केले. तेलंगणमधील भाजपच्या मतांची टक्केवारी तसेच जागाही वाढल्यानिमित्तही तानावडे यांनी नड्डा यांचे अभिनंदन केले. गोवा भाजपा प्रदेशाध्यक्ष या नात्याने तानावडे यांनी गोवा भाजपाची सद्यस्थिती व संघटनात्मक पैलूंबद्दल नड्डा यांच्याशी चर्चा केली. यावेळी पक्ष बळकट करण्याच्या दृष्टीने तसेच पक्षाची तळागाळातील पोहोच वाढविण्याच्या दृष्टीने कोणती पावले उचलावीत, याविषयी दोन्ही नेत्यांमध्ये विचारविनिमय झाला. तानावडे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत लोकसभेच्या गोव्यातील दोन्ही जागा जिंकण्यासाठी जोमाने काम करण्याच्या निर्धाराचा पुनऊच्चार केला.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article