खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडून यडवण्णावर कुटुंबीयांचे सांत्वन
11:59 AM Nov 12, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : तहसीलदार कार्यालयातील अधिकारी रुद्रण्णा यडवण्णावर यांनी काही दिवसांपूर्वी तहसीलदार कार्यालयातच आत्महत्या केली होती. त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन खासदार जगदीश शेट्टर यांनी सांत्वन केले. तसेच रुद्रण्णा यडवण्णावर यांच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. जगदीश शेट्टर तसेच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी दुपारी डॉ. आंबेडकरनगर येथील यडवण्णावर यांच्या घराला भेट दिली. यडवण्णावर यांची आई व पत्नीचे सांत्वन करण्यात आले. आत्महत्या प्रकरण अत्यंत दुर्दैवी असून दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे त्यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार संजय पाटील, भाजपचे बेळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, मुरगेंद्रगौडा पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article