महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

एलकेजी-युकेजी वर्ग सुरू करण्याच्या हालचाली

10:22 AM Jun 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा विरोध, आंदोलनाची तयारी

Advertisement

बेळगाव : शासनाचा आदेश धुडकावून सरकारी प्राथमिक शाळेत एलकेजी-युकेजी वर्ग सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे अंगणवाडी कर्मचारी संघटनांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, अंगणवाडी कर्मचारी संघटना याविरोधात तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. शिवाय लवकरच जिल्हाधिकारी आणि महिला व बालकल्याण खात्याच्या सहसंचालकांना निवेदन देऊन विरोध दर्शविला जाणार आहे. जिल्ह्यात 5 हजार 531 अंगणवाडी केंद्रे आहेत. त्यामध्ये अंगणवाडीसेविकांची आणि मदतनीसांची संख्याही मोठी आहे.

Advertisement

प्राथमिक शाळेत एलकेजी-युकेजी सुरू केल्यास अंगणवाडी केंद्रांना विद्यार्थी मिळणार नाहीत. त्यामुळे अंगणवाडी केंद्रे अडचणीत येणार आहेत. यासाठी एलकेजी युकेजी वर्ग सुरू करण्याला विविध अंगणवाडी संघटनांचा कायम विरोध आहे. खासगी शाळांमुळे आधीच अंगणवाडी केंद्रातील विद्यार्थ्यांची संख्या घटत आहे. त्यातच सरकारी शाळेत युकेजी आणि एलकेजी वर्ग सुरू केल्यास अंगणवाडी केंद्रे अडचणीत येणार आहेत. 2023 मध्ये सरकारने एलकेजी-युकेजी वर्ग सुरू करावेत, असा आदेश बजावला होता. त्यानंतर राज्यभरातून अंगणवाडी संघटनांनी याला विरोध केला होता. त्यानंतर सरकारनेच एलकेजी युकेजी वर्ग सुरू करण्याला स्थगिती दिली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article