महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कार्गो सेवेसाठी हालचाली

01:35 PM Dec 03, 2024 IST | Radhika Patil
Movements for cargo service
Advertisement

व्यापार,उद्योगातील वाहतूक अल्प वेळेत होणार : व्यापारी,उद्योग क्षेत्रातून होतेय मागणी

Advertisement

कोल्हापूर / विद्याधर पिंपळे : 

Advertisement

कोल्हापूर जिल्हा देशातील व्यापार ,उद्योगाचे तसेच निर्यातीभिमुख असे प्रमुख केंद्र आहे. यासाठी फक्त माल वाहतूकीसाठी रेल्वेसह रस्तेमार्गाचा वापर केला जात आहे. कोल्हापूरचे विमानतळ अत्याधुनिक होत आहे. यासाठी आता कार्गो (हवाई माल वाहतूक सेवा) सेवेची आवश्यकता जाणवू लागली आहे. इतर वाहतूक मार्गासाठी जादा वेळ लागतो. तसेच कोल्हापूरातील भाजीपाला व फुले या नाशवंत शेतीमालाची मोठी आर्थिक उलाढाल होते. यासाठी कोल्हापूरातून सुरू होणारी, कार्गो (हवाई मालवाहतुक) सुविधा लवकर सुरू करावी अशी मागणी व्यापार, उद्योग क्षेत्रामधून सुरू आहे. तशा हालचाली सुरू असल्याचे समजते.

कोल्हापूरातून टेक्स्टाईल, फौंड्री, साखर कारखाने, गुळ, साखर, भाजीपाला यासह मोठा व्यापार चालतो. यासाठी कोल्हापूर विमानतळावरून कार्गो सुविधा सुरू करणार असल्याची घोषणा यापूर्वी करण्यात आली होती. शिरोली, गोकुळ शिरगांव, कागल-हातकणंगले पंचताराकींत ,आजरा, हलकर्णी, गडहिंग्लज येथे औद्योगिक वसाहती आहेत. अॅटोमोबाईल क्षेत्रातील सुटे भाग, कास्टींग, शेती अवजारे, अर्थमुव्हींग, फूड इंडस्ट्रीज, संरक्षण क्षेत्राला लागणाऱ्या पार्टस्चे उत्पादन करून त्याची वाहतूक व निर्यात केली जाते. एवढेच नव्हे तर गेल्या तीन वर्षात कोल्हापूरातील उत्पादनाची निर्यात एक टक्क्यावरून दहा टक्के झाली आहे. पण याची वाहतूक फक्त रस्ता वाहतूकीव्दारे सुरू आहे.

देशातील सात विमानतळांची धावपट्टी अपग्रेड करण्याची योजना जाहीर करून काम ही सुरू केले आहे. यामध्ये कोल्हापूरच्या विमानतळाचाही समावेश आहे. हवाई प्रवाशाच्या उत्पन्नापेक्षा माल वाहतूक सेवा फायद्याचे ठरत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने हवाई मालवाहतूकीला प्राधान्य देण्याचे धोरण अवलंबवले आहे. यासाठी देशातील लहान 150 विमानतळांचे आधुनिकीकरण सकारात्मक अहवाल दिला आहे.

हवाई वाहतूकीसाठी पायाभूत सुविधांना अनुकूल बनवण्यासाठी प्राधिकरणाने उपक्रम हाती घेतला असल्याचे समजते. यामध्ये कोल्हापूर विमानतळाचा समावेश आहे. यासाठी लांब धावपट्टी, बांधकाम, तंत्रज्ञान सुविधा, मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट कनेक्शन, सॅटेलाईट फ्रेट शहरे, कार्गो टर्मिंनल्स, कोल्ड स्टोरेज,अॅटोमेटेड स्टोरेज, रिट्रीव्हल सिस्टीम, यांत्रिकी कार्गो वाहतूक, इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज (ईडीआय) प्रणाली, व्यावसायिक दस्तऐवज याची उभारणी करण्याची गरज असल्याचे सांगण्यात येते. यासाठी कोल्हापूरातील नवनिर्वाचित आमदार, कोल्हापूरातील स्टार एअरलाईन्सचे उद्योजक संजय घोडावत तसेच कोल्हापूरात शिक्षण घेतलेले केंद्रीय विमानवाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जोर लावण्याची गरज आहे.

प्राधिकरणाकडून कार्गोसाठी आधुनिकरण होणारी विमानतळे

देशातील 150 विमानतळांचे आधुनिकरण करून सुविधा देण्याचा अहवाल सादर केला असल्याचे समजते. यामध्ये कोल्हापूरसह आयझॉल, कोटा, मुझफ्फरपूर, सतवा, झिरो, जळगांव, आसनसोल, मालदा,झरसुगुडा, खंडवा, पन्ना, रक्सौल, वेल्लोर, तेजू, अगती,अकोला, बेळगांव, कूच-बिहर, गया, गोरखपूर, हुबळी, कांडला, गुल्लू, पतंगनगर, राजमुद्री आदी विमानतळांचा समावेश आहे.

कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणानंतर कार्गो सुविधा

सद्या कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी 1780 मीटर असून, मोठे व कार्गो विमान उतरण्यासाठी 2300 मीटर लांबीच्या धावपट्टीची आवश्यकता आहे. यासाठी जादा जागा आवश्यक आहे. तसेच कार्गोसाठी त्याचे डिझाईन ,सुविधा उपलब्ध करावे लागणार आहे. कोल्हापूरच्या विमानतळ विस्तारासाठी 64 एकर जागा ताब्यात घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यांनतर धावपट्टीचा विस्तार होऊन, कार्गो सुविधा उपलब्ध करता येणार आहे.

                                                                                                अनिल शिंदे, संचालक , कोल्हापूर विमानतळ

प्रवाशी विमानामध्ये मालवाहतूकीची सोय व्हावी

लक्झरी बसमध्ये वस्तू पाठवण्यासाठी एक कप्पा असतो. तशी कार्गो सोय कांही प्रवाशी विमानामध्ये केली जाते. पण कोल्हापूरातील विमान सेवेमध्ये किरकोळ कार्गोची सोय वा विभाग नाही. यासाठी कोल्हापूरातून उडडाण होणाऱ्या प्रवाशी विमानासाठी, प्राधिकरणाने मालवाहतूकीची सुविधा करावी अशी मागणी आहे.

                                                                                  बळीराम वराडे, अध्यक्ष, ट्रव्हल्स एजंट असोसिएशन कोल्हापूर 

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article