महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बाकनूर परिसरात वाघसदृश प्राण्याचा वावर

11:10 AM Sep 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण : बळीराजाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर : वनखात्याच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

Advertisement

वार्ताहर/किणये

Advertisement

बाकनूर परिसरात वाघसदृश प्राण्याचा वावर असून हा प्राणी गावातील काही शेतकऱ्यांच्या निदर्शनास आला आहे. दोन दिवसांपूर्वीच शिवारात त्याने बकऱ्यांवर हल्ला केला. यात एक बकऱ्याचे पिलू फस्त केले तर दोन बकरी जखमी झाली आहेत. कुत्र्यावरही त्याने हल्ला केला. या घटनेची माहिती वनखात्याला देण्यात आली आहे. मात्र या परिसराकडे वनखात्याचे अधिकारी फिरकलेच नाहीत. त्यामुळे बळीराजाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वनखात्याच्या अधिकाऱ्यांचे या भागाकडे दुर्लक्ष झाल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांमधून होत आहेत.

मंगळवारी सायंकाळी अर्जुन धाकलू नाईक हे बाकनूर शिवारात बकरी चारण्यासाठी घेऊन गेले होते. यावेळी वाघसदृश प्राण्याने बकऱ्यांवर हल्ला केला. यावेळी कुत्र्याने बकऱ्यांना त्या प्राण्याच्या तावडीतून सोडविण्यासाठी प्रयत्न केला. मात्र सदर कुत्र्यावरही हल्ला करण्यात आला. यात दोन बकरी व कुत्रा जखमी झाला तर एक बकऱ्याचे पिलू फस्त करण्यात आले. अर्जुन नाईक यांनी अवघ्या 15 ते 16 फुटावरून हा सर्व प्रकार पाहिला आणि घाबरून जखमी व उर्वरित बकऱ्यांना घेऊन गाव गाठले.

घटनेकडे अधिकाऱ्यांची पाठ : नागरिकांतून नाराजी

या घटनेची माहिती वनखात्याच्या शिपायांना देण्यात आली. मात्र बुधवारी केवळ या भागातील शिपाई यांनी येऊन पाहणी केली. मात्र शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही. तसेच अधिकारीही आले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

जखमी बकऱ्यांवर उपचार

बुधवारी सकाळी पशुवैद्यकीय उपकेंद्राच्या सहकारी डॉक्टरांनी जखमी बकऱ्यांवर उपचार केले. बुधवारी गावातील सावंत हे शेतकरी आपली जनावरे घेऊन शिवाराकडे जात होते. यावेळीही सदर वाघसदृश प्राण्याने त्या जनावरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण सदर जनावरांनी तेथून जोरात पळ काढला. या जनावरांसोबत शेतकरीही घाबरत घरी आला. गेल्या 22 दिवसांपूर्वीही कृष्णा गावडे शेतकरी डोंगर परिसरात जनावरे घेऊन गेले होते. त्यावेळीही गाय व कुत्र्यावर हल्ला केला होता.

तालुक्याच्या पश्चिम भागातील बाकनूर हे गाव डोंगर पायथ्याशी आहे. या गावातील बहुतांश शेतकऱ्यांची शेतजमीन डोंगराजवळ आहे. त्यामुळे त्यांना रोज शेतात जावे लागते. मात्र वन्य प्राण्यांपासून या शेतकऱ्यांची सुरक्षा करण्यासंदर्भात वनखात्यामार्फत योग्य ती उपाययोजना करण्यात येत नाही. यामुळे आता या भागात आपण शेती करायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. वाघसदृश प्राणी दिसल्यामुळे गावातील सर्व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता दिवसा शिवारात जाताना घाबरतच शेतकरी शेतात काम करत आहेत.

दाद मागायची कोणाकडे?

बाकनूर परिसरात वाघसदृश प्राण्याचा वावर वाढला आहे. वनखात्याला माहिती देऊनही जर अधिकारी वर्ग या भागात येऊन पाहणी करत नसतील तर आम्ही दाद मागायची कोणाकडे? दोन दिवसांपूर्वी ज्या ठिकाणी बकऱ्यांवर हल्ला झाला. त्यांच्या बाजूलाच आमचे शेत आहे. तसेच पोल्ट्रीफार्मसुद्धा आहे. आता या शेतात आणि या पोल्ट्रीफार्मकडे जाताना जीव मुठीत घेऊनच जावे लागत आहे.

- संदीप गोडसे

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article