देवतांचा पर्वत
मोठमोठ्या मूर्तींचे शीर अस्तित्वात
तुर्कियेतील नेम्रुत पर्वत एक महत्त्वपूर्ण पुरातत्व स्थळ असून ते प्राचीन कॉमाजीन साम्राज्याचे स्मारक आणि मंदिराचे स्थान आहे. हे स्वत:च्या आकर्षक मूर्तींसाठी प्रसिद्ध असून यातील अनेक मूर्ती देवतांच्या आहेत. याचमुळे याला देवतांचे पर्वत देखील म्हटले जाते.
या पर्वतावर अनेक मूर्तींचे शीर दिसून येते, हे ठिकाण आधुनिक शहर अद्य्यमननजीक आहे. माउंट नेम्रुटचा इतिहास ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकाचा आहे. या कालावधीदरम्यान कॉमाजीन साम्राज्याने युफ्रेट्स नदीच्या पूर्व काठावर राज्य केले होते. हे अत्यंत शक्तिशाली साम्राज्य होते, ज्याच्या संस्कृतीवर हेलेनिस्टिक आणि पर्शियन संस्कृतीची झलक दिसून येते. कॉमाजीनचे राजा एंटिओकस प्रथमने (69-34 ख्रिस्तपूर्व) स्वत:च्या साम्राज्याचे सामर्थ्य आणि संपन्नता दाखविण्यासाठी नेम्रुत पवंताच्या शिखरावर एक मकबरा तयार करविला होता, हा मकबरा देवता आणि त्याच्या पूर्वजांना समर्पित होता. कधीकाळी या मकबऱ्यात तीन छतं असायची, ज्यात अनेक मोठमोठ्या मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. एकेसमयी या मूर्तींची शीर त्यांच्या शरीरावरून हटविण्यात आले होते आणि ते पूर्ण स्थळावर विखुरले गेले आहेत. मकबऱ्याच्या पूर्व छताला पवित्र केंद्र मानले जायचे, तेथे महत्त्वपूर्ण मूर्ती आणि अवशेषांचे तुकडे दिसून येतात. मूर्तीच्या रचनेवर हेलेनिस्टिक आणि पर्शियन कलेचा प्रभाव दिसून येतो, कारण या मूर्तींचे चेहरे ग्रीककला तर त्यांचे कपडे आणि उपकरण पर्शियन कलेची वैशिष्ट्यो दर्शवितात. नेम्रुत पर्वत राजा एंटिओकस प्रथमचे देवता आणि पूर्वजांच्या विशाल मूर्तींचे घर आहे.