‘मोटोरोला रेजर 50 अल्ट्रा’ बाजारात दाखल
फ्री मोटो बड्स, गुगल एआयसह 6.9 इंचाच्या डिस्प्लेसह अन्य सुविधा मिळणार
मुंबई : स्मार्टफोन निर्मितीमधील कंपनी मोटोरोला यांनी आपला फ्लिप करण्यायोग्य स्मार्टफोन ‘मोटोरोला रेजर 50 अल्ट्रा’ याचे भारतीय बाजारपेठेत सादरीकरण केले आहे. या स्मार्टफोनची भारतामधील किंमत ही 99,999 रुपये राहणार आहे. यामध्ये 165एचझेड रिफ्रेश रेटसह 6.9 इंच पूर्ण एचडी सह पोलेड अंतर्गत मुख्य डिस्प्ले मिळणार आहे. कंपनीने यावेळी दावा केला आहे की, रेजर 50 अल्ट्रचा डिस्प्ले कोणत्याही फ्लिप फोन डिस्प्लेपेक्षा सर्वात मोठा आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये गुगलचे जनरेटिव्ह आर्टिफिशिअल इंटेलिजन्स देण्यात आले आहे. हा स्मार्टफोन भारतीय बाजारात सॉफ्ट आणि व्हेगन लेदर फिनिशसह तीन रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध होणार आहे. खरेदीदारांना 10 जुलै रोजी कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर आणि ई कॉमर्स वेबसाईट अॅमेझॉनवरुन स्मार्टफोन प्री बुक करता येणार असल्याची माहिती आहे. तसेच विशेष सवलीतीमध्ये हा फोन 10,000 रुपयांच्या सवलतीसह 89,000 रुपयांना उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे.
अन्य सुविधा
- डिस्प्ले : 16एचझेड रेटसह 6.9 इंचा एचडी डिस्प्ले
- प्रोसेसर आणि ओएस : मोटोरोलाचा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 प्रोसेसरद्वारे चालणार
- कॅमेरा : 50 एमपी सह 50 एमपी डब्बल कॅमेऱ्यांचा सेटअप मिळणार
- बॅटरी : चार्जिंग सपोर्टसह 4000 एमएएच बॅटरी बॅकअप उपलब्ध होणार
- अन्य फिचर्स : फोन चार्जिंगसाठी युएसबी टाइप सी सह 5जी, 4जी, 3जी,2जी वायफाय ब्लूट्यूथ, जीपीएस ऑफर राहणार