मोटोरोलाचा एज 60 स्मार्टफोन लाँच
किंमत 25,999 रुपये : 50 एमपी ट्रिपल कॅमेरा
मुंबई :
मोटोरोला कंपनीने भारतीय बाजारात आपला नवीन मध्यम आकाराचा स्मार्टफोन एज 60 हा नुकताच सादर केला आहे. या स्मार्टफोनची किंमत ही 25,999 रुपये आहे. यामध्ये 50 मेगापिक्सल क्षमतेचा कॅमेरा सेटअप दिला आहे. 5500 एमएएच क्षमतेची बॅटरीही मिळणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. सदरचा फोन हा एक्स 7 आणि वनप्लस नॉर्ड 4 या सारख्या कंपन्यांना थेट टक्कर देणार आहे.
हा स्मार्टफोन ग्राहकांच्यासाठी 17 जून 2025 पासून फ्लिपकार्ट, मोटोरोलाच्या अधिकृत बेवसाईट आणि रिलायन्स डिजिटल यासारख्या ऑफलाईन स्टोअर्सवरही स्मार्टफोन उपलब्ध होणार आहे. फोन दोन रंगामध्ये उपलब्ध होणार आहे.
डिझाईन : एज 60 चे डिझाइन मोटोरोलाच्या एज आवृत्तीच्या अन्य फोन्सशी मिळतेजुळते आहे, असे समजते. फोन आयपी68 आणि आयपी69 रेटिंग सोबत येणार आहे. म्हणजे धूळ आणि पाणी यामध्येही हा स्मार्टफोन खराब होणार नाही. एमआयएल एसटीडी810एच सर्टिफिकेशनही मिळणार आहे. स्क्रीनवर कॉर्निंग गोरिला ग्लास 7 आयचे संरक्षण मिळणार आहे. कंपनीने फोनमध्ये 5500 एमएएच क्षमतेची बॅटरी दिलेली आहे.