कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मोटोरोलाचा एज 60 प्रो स्मार्टफोन लाँच

07:00 AM May 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

मोटोरोला कंपनीने आपला नवा एज 60 प्रो हा स्मार्टफोन भारतामध्ये लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची किंमत तीस हजार रुपये असणार असून याला मीडियाटेक डायमनसिटी 8350 एक्स्ट्रीम प्रोसेसर दिला गेला आहे. 6000 एमएएच क्षमतेची बॅटरी दिली असून आर्टिफिशियल इंटेलिजन्सची वैशिष्ट्यादेखील यामध्ये दिली गेली आहेत. 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह येणाऱ्या स्मार्टफोनची किंमत 30 हजार रुपये असणार असून 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजच्या स्मार्टफोनची किंमत 44 हजार रुपयेपर्यंत असणार आहे.

Advertisement

7 मेपासून विक्रीला उपलब्ध

पॅन्टोन डॅझलिंग ब्ल्यू, पॅन्टोन शाडो, पॅन्टोन स्पार्कलिंग ग्रेप या रंगांमध्ये स्मार्टफोन सादर केला गेला असून स्मार्टफोनची विक्री 7 मेपासून मोटोरोलाच्या अधिकृत संकेतस्थळावरून फ्लिपकार्ट व इतर रिटेल स्टोअर्स वरती सुरू होणार आहे. 6.7 इंचाचा क्वाड कर्व्हड पीओलएलईडी डिस्प्ले याला दिला गेला असून ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे.

जबरदस्त कॅमेरा

50 मेगापिक्सल सोनी लाईट 7 प्रायमरी सेंसर आणि 50 मेगापिक्सल अल्ट्राव्हाइड लेन्स कॅमेरा आणि सेल्फी करिता 50 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. 90 डब्ल्यूचा वायर्ड आणि 15 डब्ल्यूचा वायरलेस चार्जर दिला जाणार असून धूळ आणि पाणी रोधक हे वैशिष्ट्या या फोनचे असणार आहे. कॉर्निंग गोरीला ग्लास 7 आयचे संरक्षण या स्मार्टफोनला दिले गेले आहे.

स्मार्टफोनची वैशिष्ट्यो...

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article