For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनचालक त्रस्त

12:20 PM Jun 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनचालक त्रस्त
Advertisement

फोंडा : फोंडा-बेळगांव महामार्गावरील कोपरवाडा कुर्टी, केरया खांडेपार येथे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. पावसात रस्त्यावर पाणी साचत असल्याने दुचाकीचालकांना असह्या त्रास सहन करावा लागत आहे. महामार्गावरील भाग केरया-खांडेपार ते कोपरवाडा कुर्टी मार्ग चौपदरी आहे. दुभाजकाला दोन्ही बाजूला पाणी साचत असल्याने वेगाने मार्गक्रमण करणारी चारचाकी गेल्यानंतर दुचाकीचालकावर चिखलमय पाणी उढत आहे. संततधार पाऊन पडून गेल्यानंतर पाणी साचण्याचे प्रकार वाढत आहे. केरया खांडेपार येथे रस्त्dयाचे  काम युद्धपातळीवर सुरू असल्याने येथील चिखलही रस्त्dयावर साचण्याचे प्रकार वाढलेले आहे. येथून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक पोलीस चलन कापण्यासाठी सहकारी पेट्रोलपंपच्या नाक्यावर हजेरी लावत असतात. वाहनचालक रस्त्यावरील नियम पाळून वाहन हाकतात तरीही चिखलमय पाणी उडत असल्याने वाहतूक पोलीसांनी यावरही नियंत्रण ठेवत बांधकाम खात्यांशी तक्रारीचा पत्रव्यवहार करून आपली जबाबदारी पार पाडावी. केवळ आपला चलन कोटा पुर्ण करण्यासाठी चलन कापत उभे राहू नये असे आवाहन सुज्ञ वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांना केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.