For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ट्रकने चिरडल्याने मोटारसायकलस्वार ठार

12:47 PM Oct 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
ट्रकने चिरडल्याने मोटारसायकलस्वार ठार
Advertisement

बेडकिहाळ-भोज मार्गावरील दुर्घटना : मृत कारदगा येथील रहिवासी : सुदैवाने पत्नी बचावली

Advertisement

वार्ताहर/बेडकीहाळ

येथील बेडकिहाळ-भोज मार्गावरील सांगणे मळा वळणावर माल वाहतूक करणाऱ्या ट्रकने मोटारसायकलस्वाराला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. बाळासो बाबाजी कोळेकर (वय 59, रा. कारदगा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सदलगा पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, कारदगा येथील शेतकरी बाळासो बाबाजी कोळेकर हे दुचाकीने (क्र. केए-23 एडब्लू 1590) पत्नी शेवंता कोळेकर यांना घेऊन कारदगाहून शनिवारी सकाळी वडगोल येथील बिरेसिद्धेश्वर देवालयास गेले होते. तर दर्शन संपवून सायंकाळी 4.30 च्या दरम्यान घरी परत येत असताना बेडकिहाळ भोज मार्गावरील बेडकिहाळ हद्दीतील किणीकर मळा परिसरात आल्यानंतर ट्रक (क्र. एमएच 26 सीएच 6894) चालक भारत मांगूर राठोड (रा. धामणधरी, जिल्हा नांदेड) याने 16 चाकी ट्रक रिव्हर्स घेण्याच्या नादात मोटारसायकलला चिरडले.

Advertisement

बाळासो कोळेकर यांनी मागे बसलेल्या पत्नीला रस्त्याच्या कडेला ढकलले. पण मागील ट्रकची चाके बाळासो यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.दरम्यान पत्नी शेवंता यांनी आरडाओरड केला तरी देखील ट्रक मागेच येत होता. यावेळी ट्रक चालक ट्रक पुढे घेऊन पलायन करत असताना नजीकच्या नागरिकांनी त्याला पकडले. त्वरित सदलगा पोलिसांना माहिती देताच घटनास्थळी सदलगा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक शिवप्रसाद बिरादार व साहाय्यक पोलिसांनी धाव घेऊन पाहणी केली आणि 108 रुग्णवाहिकेला पाचारण करून मृतदेह सदलगा सरकारी दवाखान्यात विच्छेदनासाठी हालविण्यात आला. घटनेची नोंद सदलगा पोलिसांत झाली आहे. रात्री उशिरा विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, दोन मुले, भाऊ, भावजय असा परिवार आहे.

Advertisement
Tags :

.