दोघा अट्टल मोटारसायकल चोरांकडून चार लाखांच्या सात मोटारसायकली जप्त
हिरेबागेवाडी पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
दोघा अट्टल मोटारसायकल चोरांना अटक करून त्यांच्याजवळून 4 लाख 10 हजार रुपये किमतीच्या सात मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. हिरेबागेवाडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
संतोष शिवप्पा ऊर्फ शिवानंद बेविनकोप्प (वय 30) राहणार इंचल, ता. सौंदत्ती, राजू निंगाप्पा पाटील (वय 32) मूळचा राहणार खानापूर, सध्या राहणार कॅम्प-बेळगाव अशी त्यांची नावे आहेत. या जोडगोळीने हिरेबागेवाडी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 3, शहापूर, माळमारुती, हुबळी व सौंदत्ती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात प्रत्येकी 1 अशा एकूण सात मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली आहे.
बेळगाव ग्रामीणचे एसीपी गंगाधर बी. एम. यांच्या मार्गदर्शनाखाली हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक एस. के. होळेन्नावर, उपनिरीक्षक अविनाश ए. वाय., बी. के. मिटगार, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर. आय. सनदी, एम. आय. तुरमरी, अक्षयकुमार नायक, प्रभाकर भुशी, आर. एस. केळगीनमनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
शुक्रवार दि. 19 सप्टेंबर रोजी संतोष व राजू या जोडगोळीला संशयावरून ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याजवळून केए 24 एक्स 9661, केए 25 ईके 1568, केए 22 एक्स 2787, केए 22 ईएफ 1093, केए 22 ईडी 0291 क्रमांकाची हिरो स्प्लेंडर प्लस, केए 24 एस 2703 क्रमांकाची हिरो एचएफ डिलक्स, केए 22 ईसी 9825 क्रमांकाची हिरो होंडा सीबीझेड मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.