कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Satara : साताऱ्यात मोटारसायकल चोरी प्रकरण उघड, दोन चोरटे अटकेत

02:29 PM Oct 19, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

                साताऱ्यात मोटारसायकल चोरटे ताब्यात

Advertisement

सातारा : सातारा शहरातून चोरीस गेलेल्या मोटारसायकल प्रकरणी सातारा शहर डी.बी. पथकाने दोन चोरट्यांना ताब्यात घेत त्यांच्या कडून दोन हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. अटक केलेल्याची नावे अबुबखर बादशाह मुलतानी (वय ३१, रा. खोजलगी, ता. गोकाक, जि. बेळगाव),रोहित सुरेश राजपूत (वय १९, रा. रेल्वे स्टेशनसमोर, कोरेगाव, जि. सातारा) अशी आहेत.

Advertisement

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय अधिकारी राजीव नवले, वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आली.

डी.बी. पथकाने सातारा शहरातील मोटारसायकल चोरीच्या प्रकरणांचा तपास सुरू ठेवला असता, दोन युवकांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून मोटारसायकली चोरी केल्याची माहिती मिळाली. त्यापैकी एक आरोपी कर्नाटक राज्यातील तर दुसरा कोरेगाव येथील असल्याचे निदर्शनास आले. पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून दोघांनाही ताब्यात घेतले.

कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी

सहा. पोलीस निरीक्षक श्याम काळे, पोलीस उपनिरीक्षक  सुधीर मोरे, पो.हवा. निलेश यादव, सुजीत भोसले, निलेश जाधव, विक्रम माने, पो.ना. पंकज मोहिते, पो.कॉ. तुषार भोसले, सागर गायकवाड, सचिन रिटे, संतोष घाडगे, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम, सुहास कदम यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली.

Advertisement
Tags :
#BikeTheft#policeaction#satarapolicecrimenewsMotorcycleRecoverysatara news
Next Article