सिव्हिल हॉस्पिटल आवारातून मोटारसायकलची चोरी
बेळगाव : सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारातून एका मोटारसायकलची चोरी झाली आहे. दि. 17 नोव्हेंबर रोजी पहाटे 4.22 च्या दरम्यान ही घटना घडली असून चोरट्याची छबी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी मोटारसायकल मालक सतीश मल्लाप्पा मुतगेकर रा. श्रीराम गल्ली, कंग्राळी खुर्द हे पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास टोलवाटोलवी चालविली आहे.
मुतगेकर यांनी आपली केए 22 वाय 6732 क्रमांकाची मोटारसायकल सिव्हिल हॉस्पिटल आवारात पार्क केली होती. मात्र तेथून त्यांच्या मोटारसायकलची 17 नोव्हेंबर रोजी पहाटे चोरी झाली आहे. तेथील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पाहिले असता मोटारसायकल चोरणाऱ्या चोरट्याची छबी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी मुतगेकर पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास चालढकल चालविली आहे.