For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोटारसायकली चोरणाऱ्या जोडगोळीची हिंडलगा कारागृहात रवानगी

01:10 PM Apr 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
मोटारसायकली चोरणाऱ्या जोडगोळीची हिंडलगा कारागृहात रवानगी
Advertisement

बेळगाव : मोटारसायकली चोरीच्या आरोपावरून मारिहाळ पोलिसांनी बुधवारी अटक केलेल्या दोघा जणांची हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. बेळगाव शहर व उपनगरात या जोडगोळीने एकूण दहा मोटारसायकली चोरल्याचे उघडकीस आले होते. मोहसीन अब्दुलमजीद जमादार (वय 34) रा. पंतबाळेकुंद्री, शब्बीर अब्दुलगणी कोळ्ळूर (वय 36) रा. आझमनगर अशी त्यांची नावे आहेत. मारिहाळचे पोलीस निरीक्षक गुरुराज कल्याणशेट्टी, उपनिरीक्षक मंजुनाथ नायक, चंद्रशेखर, बी. एन. बळगन्नावर, बी. बी. क•ाr, रमेश अक्की, हणमंत यरगुद्री, टी. जी. सुळकोड, चन्नाप्पा हुनचाळ, आर. एच. तळवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी या जोडगोळीला अटक केली आहे. अटकेची कारवाई पूर्ण करून त्यांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी तृतीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. सुळेभावी येथील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिराजवळ उभी करण्यात आलेली मोटारसायकल चोरल्याच्या आरोपावरून त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांची कसून चौकशी केली असता केवळ मारिहाळ पोलीस स्थानकच नव्हे तर मार्केट, माळमारुती, एपीएमसी, खडेबाजार पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रातही दुचाकी चोरल्याची कबुली त्यांनी दिली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.