For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगावात आज पारंपरिक शिवजयंती

10:37 AM May 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगावात आज पारंपरिक शिवजयंती
Advertisement

शिवज्योतींचे आगमन : मंडळांकडून विविध ठिकाणी पूजन : 105 वर्षांपासून परंपरा कायम

Advertisement

बेळगाव : बेळगावमध्ये मुंबई-पुण्यापेक्षाही भव्यदिव्य तसेच उत्साहपूर्ण वातावरणात शिवजयंती साजरी केली जाते. गुरुवारपासून सुरू होणाऱ्या शिवजयंती उत्सवादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. बेळगावच्या विविध भागात शिवप्रतिमांचे पूजन केले जाते.  पारंपरिक पद्धतीने बेळगावमध्ये शिवजयंती साजरी केली जाते. शिवजयंतीच्या तयारीसाठी शहर तसेच परिसरात जय्यत तयारी केली जात आहे. महाराष्ट्रामध्ये तारखेनुसार तसेच तिथीनुसार शिवजयंती साजरी होत असताना बेळगावमध्ये मात्र पारंपरिकरीत्या शिवजयंती साजरी केली जाते. मागील 105 वर्षांपासून मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंती साजरी केली जात आहे. शिवजयंतीसोबतच भव्य चित्ररथ मिरवणूक काढली जाते. यावर्षी शनिवार दि. 11 रोजी चित्ररथ मिरवणूक काढली जाणार आहे. सायंकाळी 6 वाजता चित्ररथ मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.

तयारीला आला वेग

Advertisement

बेळगावमध्ये शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीचे सजीव देखावे हे मुख्य आकर्षण असते. शिवचरित्रातील प्रसंग हुबेहूब सादर केले जातात. त्यामुळे आसपासच्या भागातील नागरिक मोठ्या संख्येने चित्ररथ पाहण्यासाठी बेळगावमध्ये दाखल होतात. हजारोंच्या उपस्थितीत चित्ररथ मिरवणूक काढली जाते. या दरम्यान ढोलताशा पथक, झांजपथक, ध्वजपथक, मर्दानी खेळ सादर केले जातात. सध्या सजीव देखावे सादर करण्यासाठी युवावर्गाची धडपड सुरू आहे. तसेच ढोलताशांचा गजर ऐकू येत आहे.

शहापूरमध्ये आज पारंपरिक पद्धतीने शिवजयंती

मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळ, शहापूरच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी करणार आहे. गुरुवार दि. 9 रोजी सकाळी 7 वाजता धर्मवीर संभाजी चौक येथे शिवज्योतीचे स्वागत होणार आहे. सकाळी 9.30 वा. छत्रपती शिवाजी उद्यान येथे शिवरायांच्या मूर्तीचे पूजन केले जाणार आहे. शहापूर व खासबाग भागात विविध ठिकाणी शिवजयंती उत्सव साजरा केला जाणार आहे. यावेळी शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष नेताजी जाधव यांनी केले आहे.

मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

पारंपरिकरीत्या गुरुवार दि. 9 रोजी बेळगावमध्ये शिवजयंती साजरी केली जाणार आहे. सकाळी 7 वाजता विविध गड-किल्ल्यांवरून आणण्यात येणाऱ्या शिवज्योतींचे स्वागत धर्मवीर संभाजी चौक येथे करण्यात येणार आहे. सकाळी 9 वाजता नरगुंदकर भावे चौकातील मंडपात शिवरायांच्या मूर्तीचे विधिवत पूजन व आरती होणार आहे. सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी उद्यान येथे शिवरायांच्या मूर्तीला पुष्पहार घालून वंदन केले जाणार आहे. यावेळी शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाने केले आहे.

शनिवारी चित्ररथ मिरवणूक

मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या माध्यमातून बेळगावमध्ये पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी होते. मागील 105 वर्षांपासून पारंपरिक शिवजयंती मोठ्या थाटात साजरी होत आहे. गुरुवार दि. 9 रोजी बेळगाव शहरासह उपनगर व तालुक्यातही शिवजयंती साजरी होणार आहे. तसेच शनिवार दि. 11 रोजी सायंकाळी 6 वाजता भव्य चित्ररथ मिरवणूक निघणार आहे.

- प्रकाश मरगाळे, मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी

Advertisement
Tags :

.