‘मोटो जी 64’ स्मार्टफोन लाँच
सुरुवातीची किंमत 14,999 रुपये : 6000 एमएएच क्षमतेची बॅटरी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
स्मार्टफोन निर्मितीमधील कंपनी मोटोरोलाने आपला नवीन कमी बजेटमधील स्मार्टफोन मोटो जी 64 हा 5-जी नेटवर्कमध्ये सादर केला आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किमत ही 14,999 रुपये राहणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. यामध्ये मीडिया टेक डायमेन्शन 7025 हा प्रोसेसर दिला आहे. यावेळी कंपनीने दावा केला आहे, की हा सेगमेंटमधील सर्वात वेगवान फोन राहणार आहे.
यासोबतच सदरच्या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंच एच डिस्प्ले, सोबत 6000एमएएच क्षमतेची बॅटरी मिळणार आहे. यासह 50 एमपी कॅमेराही उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे. कंपनीने दोन स्टोरेज व तीन रंगात हे मॉडेल बाजारात आणले आहे.
कॅमेरा : मोटो जी 64 मध्ये फोटोग्राफीसाठी डबल कॅमेरा सेटअप असून 8 एमपी अल्ट्रा वाइड अँगल कॅमेऱ्याचाही समावेश आहे. यासह सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठीही पंच होल डिझाईन केले आहे.
रॅम व स्टोरेज : कंपनीने मोटो स्मार्टफोन 8जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेजचा तसेच 12 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेजचा पर्यायासह सादर केला आहे.
ओएस प्रोसेस : स्मार्टफोनच्या कामगिरीसाठी 2.5 जीएचझेड ऑटो कोर सीपीआयसह मीडीया टेक डायमेंशन 7025 प्रोसेसर आहे. अँड्रॉइड 14 ऑपरेटिंग सिस्टम आहे. अत्याधुनिक कनेक्टिव्हिटीही उपलब्ध होणार आहे.