मोटो जी -85 स्मार्टफोन विविध वैशिष्ट्यांसह लाँच
50 मेगापिक्सलचा सोनी कॅमेरा, 18 ते 20 हजार राहणार किंमत
वृत्तसंस्था/ मुंबई
चिनी कंपनी लेनोवोने मोटो जी85 हा 5जीस्मार्टफोन लॉन्च केला आहे. मोटो जी सिरीज अंतर्गत दाखल करण्यात आलेला हा स्मार्टफोन 50 मेगापिक्सल सोनी कॅमेरासह येणार आहे.
8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असणाऱ्या स्मार्टफोनची किंमत साधारणपणे 18 हजार रुपये असणार असून 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजच्या स्मार्टफोनची किंमत 20 हजार रुपयापर्यंत असणार आहे. ऑलिव्ह ग्रीन, कोबाल्ट ब्ल्यू आणि वेगन लेदर फिनिश या तीन रंगांमध्ये हा स्मार्टफोन लॉन्च केला गेला आहे.
कुठे खरेदी कराल
16 जुलैला दुपारी बारानंतर मोटोरोलाच्या संकेतस्थळावर त्याचप्रमाणे फ्लिपकार्ट व इतर रिटेल स्टोअर्सवर हा स्मार्टफोन खरेदीकरता उपलब्ध होणार आहे. काही ठराविक बँकांच्या कार्डवर सदरचा स्मार्टफोन खरेदी केल्यास एक हजार रुपयांपर्यंतची सवलतही प्राप्त करता येणार आहे.
वैशिष्ट्यो काय आहेत ती पाहुया
6.7 इंचाचा थ्रीडी कर्व्ह पीओएलईडी डिस्प्ले यात असणार असून कॉर्निंग गोरिला ग्लास पाचचे संरक्षणही दिले जाणार आहे. कॉलकॉम स्नॅपड्रॅगन सहा एस जन थ्री चीप यामध्ये असणार असून 50 मेगापिक्सलचा सोनी लिटिया 600 चा सेन्सर यामध्ये दिला गेला आहे. आठ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड अँगल सेंसर त्याचप्रमाणे सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा दमदार फ्रंट कॅमेरा दिला आहे. यामध्ये 50000 एमएएचची बॅटरी असणार असून 33 डब्ल्यूची फास्ट चार्जिंगची सुविधाही यात असेल.