महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मोटिव्हेशनल स्पीकर विवेक बिंद्राला अटक होण्याची शक्यता

03:54 PM Dec 25, 2023 IST | Kalyani Amanagi
Advertisement

मोटिव्हेशनल स्पीकर विवेक बिंद्रा यांच्या विरोधात पोलिसांना त्यांच्या सोसायटीत सबळ पुरावे मिळाले असून त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.संदीप महेश्वरी आणि विवेक बिंद्रा यांच्यात वाद सुरू असतानाच विवेक बिंद्रा याच्या पत्नीने देखील कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून त्यांना बिंद्रा यांच्या विरोधात त्यांच्या सोसायटीत सबळ पुरावे मिळाले आहे.

Advertisement

लग्न झाल्यानंतर काही दिवसातच बिंद्रा यांच्यावर त्यांची पत्नी यानिका हिने कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. विवेक बिंद्रा याने यानिकाला एका बंद खोलीत मारहाण केली. तिचे केस ओढून शिवीगाळ देखील केली. या मारहाणीत यानिकाचा मोबाईल फुटला, व तिच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या आणि कानाला देखील गंभीर इजा झाली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी विवेक बिंद्रा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सुरू केला असून बिंद्रा यांच्या विरोधात पोलिसांना अनेक सबळ पुरावे सापडले आहेत. बिंद्रा राहत असलेल्या सोसायटीतील नागरिकांनी त्यांना महत्त्वाची माहिती दिली आहे. सुपरनोव्हा सोसायटीत पोहोचल्यानंतर पोलिसांनी सुमारे १७ दिवसांपूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झालेल्या ठिकाणची पाहणी केली.

Advertisement

Advertisement
Tags :
#jailARRESTmotivational speakerpolicesandeep maheshwarivivekbindra
Next Article