For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमृतसर विमानतळावर 1.50 कोटींचे सोने जप्त

06:24 AM Nov 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
अमृतसर विमानतळावर 1 50 कोटींचे सोने जप्त
Advertisement

वृत्तसंस्था/ अमृतसर

Advertisement

पंजाबमधील अमृतसर येथील श्री गुरु रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुमारे 1.50 कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे. हे सोने दुबईतून भारतात आणले जात होते. आश्चर्याची बाब म्हणजे प्रवाशाने हे सोने आपल्या अंतर्वस्त्रांमध्ये लपवले होते. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना तस्करीबाबत संशय आल्याने त्यांनी त्याची झडती घेतल्यानंतर त्याला पकडण्यात आले. आरोपीकडून चार पाऊचमध्ये पेस्टच्या स्वरूपात असलेले 1935.14 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. सोने आणणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याची चौकशी सुरू केली आहे.

दुबईहून आलेले विमान अमृतसर विमानतळावर उतरताच तपासणीदरम्यान प्रवाशाला पकडण्यात आले. जप्त केलेल्या सोन्याची किंमत दीड कोटी रुपये असल्याचे कस्टम विभागाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात सांगण्यात आले.  सदर प्रवाशाने चार पाऊचमध्ये पेस्ट फॉर्ममध्ये सोने भरून आपल्या अंतर्वस्त्रात लपवले होते. त्याची संशयास्पद हालचाल दिसताच कस्टम अधिकाऱ्यांनी प्रवाशांची कसून तपासणी सुरू केली असता तस्करीचा पर्दाफाश झाला. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोने जप्त केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.