रायफल शुटिंगमध्ये मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलची राष्ट्रीय स्तरावर झेप
सावंतवाडीच्या आयुष पाटणकरने एअर पिस्टलमध्ये पटकावले गोल्ड मेडल
सावंतवाडी । प्रतिनिधी
जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने दिनांक १५ डिसेंबर २०२३ रोजी विभागीय क्रीडा संकुल कोल्हापूर येथे आयोजित राज्यस्तरीय रायफल शुटींग कीडा स्पर्धेत सिं.जि.शि.प्र. मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडीच्या कु. आयुष दत्तप्रसाद पाटणकर (इ.१०वी) या विदयार्थ्यांने १७ वर्षे खालील वयोगटात एअर पिस्टल या क्रीडा प्रकारात गोल्ड मेडल पटकावत उत्तुंग यश प्राप्त केले असून तो राष्ट्रीयपातळीवर रायफल शूटिंग स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
त्याच्या यशाचा जल्लोष C.S. जिल्हा. शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले, अध्यक्ष श्री राणीसाहेब श्रीमती. शुभदादेवी भोंसले, विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले, विश्वस्त युवराजनी श्रद्धाराजे भोंसले व संस्थेचे सदस्य, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. अनुजा साळगावकर, प्रशिक्षक श्री. कांचन उपरकर, वर्म शिक्षक श्री. भूषण परब, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक-शिक्षक संघ कार्यकारिणी सदस्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.