आईकडे माणुसकीची संपन्नता देण्याची ताकद
डॉ. प्रीती शिंदे यांचे प्रतिपादन
कवितेच्या माध्यमातून दिली अनेक उदाहरणे
गडहिंग्लज लोकशिक्षण व्याख्यानमाला 2024
कोल्हापूर
जगातील प्रत्येक कर्तुत्वान पुरुष आणि स्त्राrच्या मागे अथांग सागरासारखी पसरलेली ताकद म्हणजे आपली आईच आहे. प्रत्येकाची शक्ती, मालक, पालक आणि संस्काराची शिदोरी घेऊनच आई ही विश्वसुंदरीपेक्षा सुंदर असते हे पाहण्यासाठी फक्त आपल्या विचाराची ताकद समोर ठेवण्याची गरज आहे. यामुळेच जगातील प्रत्येक आईकडे माणुसकीची संपन्नता देण्याची ताकद असल्याचे प्रतिपादन डॉ. प्रीती शिंदे यांनी केले.
येथील नाथ पै. विद्यालयाच्या मैदानावर सुरू असणाऱ्या साने गुरूजी लोकशिक्षण व्याख्यानमालेत तीसरे पुष्प गुंफताना ‘आई समजून घेताना’ या विषयावर त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी डॉ. स्वाती इंगवले होत्या. तर श्रद्धा सागर, कार्यालयीन अधीक्षक डॉ. सारिका खोत यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत, परिचय राजश्री कोले यांनी केले.
यावेळी बोलताना डॉक्टर शिंदे म्हणाल्या, परिस्थितीच्या छातीवर बसून शेवटच्या श्वासापर्यंत मुलाबाळाचा विचार करणारी आणि घराला घरपण देणारी व्यक्ती म्हणजे दोन शब्दातली आई होय. आजच्या घडीला आईला समजून घेताना आपापल्या पद्धतीने समजून घेत असले तरी आईचे पांग कुठेच फेडता येत नाही. याची अनेक उदाहरणे आपल्या कवितेच्या माध्यमातून त्यांनी सांगितल्या. जगातील सर्वात श्रीमंत होण्यापेक्षा आपल्या आई-वडिलांच्या समोर नतमस्तक झाला तर श्रीमंत व्यक्तीपेक्षा आपण शक्तिशाली माणूस होऊ शकतो हे सांगत इतिहासातील छत्रपती शिवाजी महाराज आणि मध्ययुगीन काळातील सम्राट अशोक, चंद्रगुप्त मौर्य यांची उदाहरणे दिली. जिथे पुरुष थकतात तिथे आई म्हणून न थकता घराला आणि आपल्या मुलाबाळाला वाढवत असल्याची अनेक घटना त्यांनी आपल्या व्याख्यानात सांगितल्या. आजच्या पिढीने देवाला नमस्कार करण्यापेक्षा घरातील सामर्थ्यवान आणि कर्तुत्वान स्त्राr म्हणजे आपल्या आईला नमस्कार केला तर अनेक पुण्य केल्याचे कर्म तयार होतील असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला. अध्यक्षीय भाषण डॉ. स्वाती इंगवले यांनी केले. सूत्रसंचालन अश्विनी पाटील यांनी केले तर आभार कार्यालयीन अधीक्षक डॉ. सारिका खोत यांनी मानले.