महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कळंगुटमध्ये मदर केअर बूथ, बेबी फिडिंग बूथ सुरू

01:24 PM Jan 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कळंगुट पंचायत व ग्लोबी सर्व्हीस अँड सोल्युशनचा उपक्रम

Advertisement

म्हापसा : सरत्या वर्षाला निरोप देत येणाऱ्या नवीन वर्षाचे अनेकजण जल्लोषात स्वागत करतात. नवीन वर्षाचे स्वागत करताना अनेकजण आपण या नवीन वर्षात काय करणार असा संकल्पही करतात. 2024 वर्षाचे स्वागत करताना कळंगुट ग्रामपंचायतीच्या उपसरपंच  गीता लक्ष्मण परब यांनी नि:स्वार्थीपणे पर्यटनदृष्टीने देशी, विदेशी पर्यटकांचा विचार करीत कळंगुटमध्ये एक आगळावेगळा संकल्प केला. या संकल्पातून केवळ कळंगुटच नव्हे तर संपूर्ण राज्यात हे वरदान ठरणार आहे, अशी संकल्पना आजवर राज्यात कुणीही केली नाही. पयंटकांच्या सोयीसाठी गोव्यात प्रथमच आणि तोही कळंगुटमध्ये मदर केअर बूथ, बेबी फिडिंग बूथ सुरू केला आहे. देशी-विदेशी पर्यटकांसाठी आपल्या पाल्यांना दूध पाजण्यासाठी हे एक वरदानच ठरणार आहे.

Advertisement

आईचे दूध पाल्यांसाठी शक्तीचे स्रोत

कळंगुट पंचायत व ग्लोबी सर्व्हीस अँड सोल्युशन यांच्या सहकार्याने उपसरपंच गीता लक्ष्मण परब यांनी हा उपक्रम राबविला आहे. याबाबत दै. तरुण भारतला माहिती देताना परब म्हणाल्या की, लहान मुलांना सहाव्या महिन्यानंतर जास्त आहार लागत नाही. तरी आईचे दूध हा त्यांच्यासाठी शक्तीचा मोठा स्रोत असतो. त्यामध्ये अ जीवनसत्व, लोह आणि प्रथिनेदेखील भरपूर असतात. स्तनपान चालू असेपर्यंत बाळाला आईच्या दूधाद्वारे रोगांपासून संरक्षण मिळते. सहा महिने ते 1 वर्ष या काळात इतर आहार देण्याच्या आधी बाळास आईचे दूध महत्त्वाचे असते.

अनेकवेळा दूध पाजण्यासाठी जागा शोधावी लागते

गोवा हे जागतिक पर्यटन स्थळ आहे. त्यामुळे समुद्रकिनारे पर्यटकांनी खचाखच भरलेले असतात. अशा वेळी अनेक पर्यटक महिलांना आपल्या छोट्या तान्ह्याला पाजण्यासाठी जागा शोधावी लागते. अनेक वेळा ते गैरसोयीचे ठरते. या महिला पर्यटकांना आपल्या मुलांना पाजणे शक्य व्हावे, हा विचार कळंगुटच्या उपसरपंच गीता लक्ष्मण परब पालयेकर यांच्या लक्षात आला. त्यांच्याच प्रयत्नाने दूरदृष्टीने पर्यटकांच्या सोयीसाठी गोव्यात प्रथमच कळंगुट येथे हा बेबी फिडींग बुथ सुरू केला आहे.

या उपक्रमाची दखल समाज माध्यमांनी घ्यावी

गोव्यात येणाऱ्या किंबहुना या भागात येणाऱ्या पर्यटकांना निश्चितच गोव्याच्या पर्यटन दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असे हे वरदान ठरणार आहे. अशी संकल्पना आणि विचार रुजविणाऱ्या गीता परब या महिल्या लोकप्रतिनिधी असतील. या आदर्शवत कामाची दखल समाजमाध्यमांनी घेणे गरजेचे आहे आणि भविष्यात पर्यटनदृष्ट्या योग्य असे हे कार्य विस्तारित होणे गरजेचे आहे. कळंगुट पंचायतीचा हा उपक्रम व उपसरपंच गीता परब कौतुकास पात्र आहेत.

असे बुथ किनारी भागात सर्व पंचायत पातळीवर व्हावे

कळंगुट भागात आपल्या वॉर्डमध्ये विद्युत रोषणाई आदी विकासकामे सुरू होती. त्यावेळी आपल्या संकल्पनेतून आलेला प्रस्ताव पंचायतीकडे मांडला होता. त्यास सरपंच व पंचायत मंडळाने त्यास मान्यता दिली, अशी माहिती उपसरपंच गीता परब यांनी दिली. कळंगुट बरोबरच कांदोळी, हणजूण, हरमल भागातील किनारपट्टीवरील पंचायतींनी पुढाकार घेऊन आपापल्या क्षेत्रात असे बुथ सुरू करणे पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे असून याची दखल सरकारी पातळीवरही घेणे काळाची गरज आहे, अशी माहिती उपसरपंच गीता परब यांनी दिली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article