For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चालू वर्षात चांद्रयान-3 संबंधी गुगलवर सर्वाधिक सर्च

06:28 AM Dec 13, 2023 IST | Tarun Bharat Portal
चालू वर्षात चांद्रयान 3 संबंधी गुगलवर सर्वाधिक सर्च
Advertisement

गुगलकडून टॉप-10 सर्च टॉपिक्सची यादी जारी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

2023 हे वर्ष आता काही दिवसांमध्येच संपणार आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही गुगलने पूर्ण वर्षात सर्वाधिक सर्च करण्यात येणाऱ्या विषयांची यादी जारी केली आहे. देशात चालू वर्षात चांद्रयान-3 विषयी सर्वाधिक सर्च करण्यात आला आहे.  गुगल ट्रेंड्सनुसार 20 ऑगस्ट पासून 26 ऑगस्टपर्यंत चांद्रयान-3 विषयी सर्वाधिक सर्च करण्यात आला. याच कालावधीत चांद्रयान-3ने चंद्रावर यशस्वी लँडिंग केले होते.

Advertisement

चांद्रयान-3 नंतर न्यूज इव्हेंट्समध्ये कर्नाटक निवडणूक निकालासंबंधी सर्वाधिक सर्च करण्यात आला. हा निकाल 13 मे रोजी लागला होता. इस्रायल तसेच अभिनेता सतीश कौशिक यांच्या निधनासंबंधी अधिक जाणून घेण्यास लोकांनी रुची दाखविली आहे. अर्थसंकल्प-2023, तुर्कियेतील भूकंप, अतीक अहमद हत्या, मणिपूर हिंसा आणि ओडिशा रेल्वे दुर्घटना हे वर्षातील 10 आघाडीच्या सर्च टॉपिकमध्ये राहिले आहेत.

चांद्रयान-3 ही भारताची तिसरी चांद्रमोहीम होती. या मोहिमेच्या अंतर्गत चांद्रयान-3 ने 14 जुलै रोजी दुपारी 2.35 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून उ•ाण केले होते. 23 ऑगस्ट रोजी चांद्रयानाने चंद्राच्या दक्षिण ध्रूवावर यशस्वी लँडिंग पेले होते. याचबरोबर भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रूवावर उतरणारा पहिला देश ठरला होता. चांद्रयान-3 च्या यशाबद्दल गुगलने ऑगस्टमध्ये डूडल तयार करून आनंद जल्लोष केला होता.

Advertisement
Tags :

.