For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

यल्लम्मा देवीच्या दानपेटीत दीड कोटीहून अधिक रक्कम

10:56 AM Jan 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
यल्लम्मा देवीच्या दानपेटीत दीड कोटीहून अधिक रक्कम
Advertisement

वार्ताहर /बाळेकुंद्री

Advertisement

कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीच्या मंदिराची दानपेटी गुरुवारी खोलण्यात आली. देवीच्या भक्तांनी साठ दिवसात 1 कोटी 68 लाखांहून अधिक रकमेचे दान रेणुकाचरणी अर्पण केले आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेली मोजणी गुरुवारी पूर्ण झाली. ही मोजणी ईन पॅमेरा भाविकांच्या उपस्थितीत करण्यात आली. यासाठी मंदिराचे शासनाधिकारी, जिल्हाधिकारी व देवस्थानचे कार्यनिर्वाहक अधिकारी एसबीपी महेश यांच्या उपस्थितीत दानपेटी खोलण्यात आली. या दानपेटीत 1 कोटी 39 लाख रु. रोख, 25 लाख 72 हजार रु. किमतीचे सोने, 3 लाख 28 हजार रु. किमतीची चांदी आढळली. गेल्या 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर काळात हुंडीत दान केलेली रक्कम, सोने-चांदीचे दागिने मोजण्याचे काम गुरुवारी पूर्ण झाले.

दानपेटीत विदेशी चलन

Advertisement

दानपेटी खोलली असता केनिया, सिंगापूर, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आदी देशांची चलने हुंडीत आढळली आहेत.

Advertisement
Tags :

.