महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शंभरहून अधिक जणांचे व्हॉट्सॲप लटकले

12:39 PM Oct 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सायबर गुन्हेगारांचा उच्छाद सुरूच : अनोळखी लिंकवर क्लिक न करण्याचे आवाहन

Advertisement

बेळगाव : आपल्या मोबाईलमधील मेसेज बॉक्सवर अनोळखींकडून येणाऱ्या मेसेजवर क्लिक केल्यास व्हॉट्सॲप हॅक होत आहे. गेल्या आठवड्याभरात बेळगाव परिसरातील सुमारे शंभरहून अधिक जणांचे व्हॉट्सॲप हॅक झाल्यामुळे खळबळ माजली असून अनेकांनी सायबर क्राईम विभागाकडे यासंबंधी तक्रार केली आहे. सायबर गुन्हेगारांच्या कारवाया थांबता थांबेनात. तीन दिवसांपूर्वी आदर्शनगरमधील एका महिलेच्या मोबाईलवर मैत्रिणीच्या नावे एक मेसेज आला. मेसेज बॉक्समधील सहा डिजिट क्रमांकाची तातडीने गरज आहे. तो मेसेज लवकरात लवकर फॉरवर्ड करा, असा तो मेसेज होता. मेसेज फॉरवर्ड झाल्यानंतर व्हॉट्सॲप हॅक झाले.

Advertisement

केवळ त्या महिलेचाच नव्हे तर त्यांच्या संपर्कातील अनेकांचे व्हॉटसॲप हॅक झाले. त्यांच्या संपर्कातील मोबाईल क्रमांकांना सायबर गुन्हेगारांकडून मेसेज सुरू झाले. प्रसंगावधान राखून आपला व्हॉट्सॲप डिलिट केल्यामुळे त्यांची फसवणूक झाली नाही. ज्यांनी ज्यांनी अनोळखी मोबाईल क्रमांकावरून आलेल्या लिंकवर क्लिक केले आहे, त्यांचा व्हॉट्सॲप हॅक झाला असून त्यांनी न पाठवताच त्यांनी संपर्कातील मोबाईल क्रमांकांना वेगवेगळे मेसेज सुरू झाले आहेत. डॉक्टर, उद्योजक, सामाजिक कार्यकर्त्यांचे व्हॉट्सॲप हॅक झाले आहेत. गेल्या आठवड्याभरात शंभरहून अधिक जणांचे व्हॉट्सॲप हॅक झाले असून एका व्यक्तीचे व्हॉट्सॲप हॅक झाल्यानंतर त्यांच्या क्रमांकावरून सायबर गुन्हेगारांकडून त्यांच्या संपर्कातील साऱ्यांनाच मेसेज पाठवला जातो. हॅकिंगची ही साखळी सुरूच राहते.

अनोळखींकडून येणाऱ्या लिंकवर कोणीही क्लिक करू नये

यासंबंधी शहर सीईएन विभागाचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांच्याशी संपर्क साधला असता अनोळखी मोबाईल क्रमांकावरून येणारे लिंक क्लिक करू नये, अनेकवेळा आमिष दाखवून लिंक पाठवलेले असतात. लिंकवर क्लिक केले की साहजिकच मोबाईल हॅक होतो व आपल्या कॉन्टॅक्टमधील इतरांना असाच मेसेज जातो. त्यामुळे अनोळखींकडून येणाऱ्या लिंकवर कोणीही क्लिक करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

पोषण ट्रॅकर ॲपच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार अद्याप सुरूच 

गर्भवती महिलांसाठीच्या पोषण ट्रॅकर ॲपच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार अद्याप सुरूच असून तुमच्या बँक खात्यात रक्कम जमा करायची आहे, असे सांगत आणखी काही महिलांच्या खात्यातील रक्कम हडप करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article