महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

2,000हजाराच्या 97 टक्क्यांपेक्षा अधिकच्या नोटा बँकेत परतल्या

06:49 AM Dec 02, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारतीय रिझर्व्ह बँकेची माहिती : 19 मे 2023 पर्यंत चलनात असलेल्या नोटांची परत आलेली टक्केवारी

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

1 डिसेंबर रोजी म्हणजे 19 मे 2023 पर्यंत चलनात असलेल्या 2000 च्या 97.26 टक्के नोटा बँकांमध्ये परत आल्या आहेत. या नोटा मागे घेण्याच्या घोषणेच्या वेळी देशात 3.56 लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या. यापैकी 30 नोव्हेंबरपर्यंत लोकांकडे फक्त 9,760 कोटी रुपयांच्या नोटा शिल्लक आहेत, अशी माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) दिली आहे. आरबीआयने यावर्षी 19 मे रोजी 2000 च्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. 2016 मध्ये नोटाबंदीनंतर या नोटा चलनात आल्या. या नोटा बदलण्याची किंवा बँकांमध्ये जमा करण्याची शेवटची तारीख 7 ऑक्टोबर होती. नोटा अजूनही आरबीआयच्या इश्यू ऑफिसमध्ये बदलल्या किंवा जमा केल्या जाऊ शकतात.

2000 रुपयांच्या नोटा अजूनही कायदेशीर राहतील, असे आरबीआयने म्हटले आहे. बँकेत नोटा जमा करण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर, आरबीआयच्या 19 इश्यू ऑफिसमध्ये 2000 रुपयांच्या नोटा बदलून किंवा जमा केल्या जाऊ शकतात. 2000 रुपयांच्या 20 हजार रुपयांच्या नोटा एकावेळी बदलल्या जाऊ शकतात. दुसरीकडे, जर तुम्हाला ती तुमच्या बँक खात्यात जमा करायची असेल, तर तुम्ही इश्यू ऑफिसद्वारे 2000 च्या कितीही नोटा जमा करू शकता असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे.

अन्य नोंदी

?2018-19 पासून 2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली

?2000 रुपयांची नोट नोव्हेंबर 2016 मध्ये बाजारात आली

?त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती.

?त्यांच्या जागी 500 आणि 2000 रुपयांच्या नोटा नवीन पॅटर्नमध्ये सादर  केल्या

?2021-22 मध्ये 38 कोटी रुपयांच्या 2000 रुपयांच्या नोटा नष्ट झाल्या.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article