For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोव्यात 300हून अधिक घरांना हरित ऊर्जा मिळणार

03:55 PM Jun 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
गोव्यात 300हून अधिक घरांना हरित ऊर्जा मिळणार
Advertisement

पणजी : पंतप्रधान सौरऊर्जा मोफत वीज योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांसह, राज्यात लवकरच 300 हून अधिक निवासी घरांना ‘हरित ऊर्जा’ निर्माण करण्यासाठी छतावरील सौर यंत्रणा मिळेल. या योजनेसाठी 9 हजारहून अधिक लोकांनी नोंदणी केली होती परंतु केवळ 379 अर्जांनाच सौरऊर्जा यंत्रणा बसविण्यासाठी राज्याकडून मान्यता  प्राप्त झाली. सध्या या प्रणालीशी 59 घरे जोडलेली आहेत जी सुमारे 500 किलो व्हॅट हरित ऊर्जा निर्माण करतात. सध्या निवासी ग्राहक 10 मेगावॅट पीक व्यावसायिक ग्राहक 13 मेहावॅट, औद्योगिक ग्राहक 33 मेगावॅट आणि इतर 1.4 मेगावॅट वीज निर्माण करत आहेत.

Advertisement

सरकारी इमारतींवर छतावरील सौरयंत्रणा आणि सरकारी जमिनीवर सौरयंत्रणा बसवण्यासाठी सरकारने अभ्यास केला आणि सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला. 41 मेगावॅट छतावरील सौर यंत्रणा एकूण 383 सरकारी इमारतींवर स्थापित केली जाऊ शकते, अशी माहिती सचिवालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. एकूण संभाव्य क्षमता 458.70 मेगावॅट सौरऊर्जा तयार करणारी सौरऊर्जा यंत्रणा सरकारी जमिनीवर स्थापित केली जाऊ शकते. या योजनेने निवासी क्षेत्रांमध्ये 1 कोटी छतावरील सौरयंत्रणा स्थापनेची योजना आखली आहे. देशातील 1 कोटी कुटुंबांना मोफत किंवा कमी दरात वीज उपलब्ध करून देण्यासाठी मदत होईल.

Advertisement
Advertisement
Tags :

.