महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

लोकअदालतीमध्ये 21 हजारांहून अधिक खटले निकालात

06:51 AM Dec 10, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अब्जावधी रुपयांची देव-घेव, कौटुंबिक न्यायालयात 18 दाम्पत्यांची मने जुळविली

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

राष्ट्रीय लोकअदालतीला दिवसेंदिवस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शनिवारी झालेल्या लोकअदालतीमध्ये 21 हजार 909 खटले निकालात काढण्यात आले. यावेळी अब्जावधी रुपयांची देव-घेव झाली. बेळगाव जिल्हा न्यायालयासह संपूर्ण तालुक्यातील न्यायालयांमध्ये ही लोकअदालत भरविण्यात आली. त्याला सर्वत्र प्रतिसाद मिळाल्याची माहिती जिल्हा कायदा सेवा प्राधिकारचे सचिव मुरलीमनोहर रे•ाr यांनी दिली.

जिल्हा मुख्य सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश विजयालक्ष्मी देवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोकअदालत भरविण्यात आली. प्रत्येक न्यायालयामध्ये खटले निकालात काढले गेले आहेत. सर्वच ठिकाणी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. फौजदारी खटले मोठ्या प्रमाणात निकालात काढण्यात आले. एकूण 16 हजार 858 खटले निकालात लागले. 1723 दिवाणी आणि अपघातांमध्ये जखमी व मृत्यू झालेल्यांचे एकूण 178 खटले निकालात काढले गेले आहेत.

अपघातामध्ये निकालात लागलेल्या खटल्यांमध्ये 8 कोटी 64 लाख 98 हजार 559 रुपयांची नुकसानभरपाई संबंधित कुटुंबांना देण्यात आली आहे. याचबरोबर फौजदारी, चेकबॉन्स, कर्जभरणा, फसवणूक, वीज बिलांसंदर्भातील खटले निकालात काढण्यात आले आहेत. प्रत्येक न्यायालयामध्ये पक्षकार आणि त्यांच्या वकिलांसमोरच हे खटले निकालात काढण्यात आले.

एकूण 18 दाम्पत्यांची मने पुन्हा जुळली

सध्या कौटुंबिक न्यायालयामध्येही मोठ्या प्रमाणात खटले दाखल होत आहेत. घटस्फोटाबरोबरच पोटगीसाठी दाखल होणाऱ्या खटल्यांची संख्या वाढली आहे. कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून घटस्फोट देण्यापेक्षा पुन्हा त्यांची मने जुळतात का? याची चाचपणी करून अनेकांना पुन्हा नव्याने संसाराला लावण्याचे काम करण्यात आले. शनिवारी झालेल्या लोकअदालतीमधून जिल्ह्यातील 18 जणांची पुन्हा नव्याने संसारासाठी मने जुळविण्यात आली. मागील लोकअदालतीमध्ये 13 जणांना पुन्हा एकत्र करण्यात आले होते.

मुख्य जिल्हासत्र न्यायालयाच्या न्यायाधीश विजयालक्ष्मी देवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोकअदालत पार पडली. या लोकअदालतीसाठी सर्व न्यायाधीश व वकिलांनी सहकार्य केले. जिल्हा कायदा सेवा प्राधिकारचे सचिव मुरलीमनोहर रे•ाr यांनी ही लोकअदालत यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article