For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आयपीएलच्या मेगा लिलावात उतरणार 1500 पेक्षा जास्त

06:56 AM Nov 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
आयपीएलच्या मेगा लिलावात उतरणार 1500 पेक्षा जास्त
Advertisement

सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात होणार लिलाव : सर्वाधिक भारतीय खेळाडू लिलाव प्रक्रियेत

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 18 वा सीझन म्हणजेच 2025 मध्ये खेळला जाणारा आयपीएल चाहत्यांसाठी खूप रंजक असणार आहे. 31 ऑक्टोबर रोजी सर्व 10 आयपीएल फ्रॅचायझींनी त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली. यानंतर आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने मेगा लिलावाच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. ज्याचे आयोजन 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियामधील जेद्दाह या अरबी शहरात होणार आहे. यावेळी एकूण 1574 खेळाडूंनी आयपीएल मेगा लिलावासाठी आपली नावे नोंदवली असून त्यापैकी 1165 भारतीय खेळाडू आहेत.

Advertisement

आयपीएलमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेगा प्लेयर ऑक्शनसाठी 48 भारतीय खेळाडू आहेत. ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. ज्यामध्ये ऋषभ पंत, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल सारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. याशिवाय 152 भारतीय खेळाडू आहेत, ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले नाही. पण आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे. याशिवाय 965 भारतीय अनकॅप्ड खेळाडू आहेत. ज्यांनी अद्याप आयपीएलमध्ये पदार्पण केलेले नाही. अशा परिस्थितीत, मेगा लिलावात सहभागी होण्यासाठी एकूण 1165 भारतीय खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत. यापैकी ही यादी आता सर्व फ्रँचायझींकडे सोपवली जाईल, त्यानंतर मेगा लिलावापूर्वी अंतिम यादी जाहीर केली जाईल. ज्यामध्ये किती खेळाडूंवर बोली लावली जाईल याचा निर्णय घेतला जाईल.

अनेक परदेशी खेळाडूंचा सहभाग

16 विविध देशांतील 409 खेळाडूंनी आयपीएल मेगा लिलावामध्ये सहभागी होण्यासाठी आपली नावे नोंदवली आहेत, त्यापैकी 272 खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. याशिवाय, असे फक्त 3 खेळाडू आहेत. जे गेल्या आयपीएलचा भाग होते परंतु त्यांनी आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही सामना खेळलेला नाही. यामध्ये 104 अनकॅप्ड परदेशी खेळाडूंचा समावेश आहे, जे आधी आयपीएलचा भाग नव्हते किंवा त्यांनी अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले नाही.

लिलावात सर्वाधिक खेळाडू भारतातील, परदेशातील खेळाडूंचाही बोलबाला

मेगा लिलावासाठी ज्या 1,574 खेळाडूंनी आपली नावे दिली आहेत, त्यापैकी 1,165 खेळाडू भारतातील आहेत. या लिलावासाठी दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील 50 हून अधिक खेळाडूंनी आपली नावे दिली आहेत. यावेळचा लिलावदेखील खास असेल कारण यात अमेरिका, यूएई, कॅनडा आणि अगदी इटलीचे खेळाडूही दिसणार आहेत. या लिलावासाठी अफगाणिस्तानचे 29 खेळाडू, ऑस्ट्रेलियाचे 76 खेळाडू, बांगलादेशचे 13 खेळाडू, कॅनडाचे 4 खेळाडू, इंग्लंडचे 52 खेळाडू, आयर्लंडचे 9 खेळाडू, इटलीचा 1 खेळाडू, नेदरलँडचे 12, न्यूझीलंडचे 39 खेळाडू. स्कॉटलंडचे 2 खेळाडू, दक्षिण आफ्रिकेचे 91 खेळाडू, श्रीलंकेचे 29 खेळाडू, यूएईचे 1 खेळाडू, यूएसएचे 10, वेस्ट इंडिजचे 33 आणि झिम्बाब्वेचे 8 खेळाडू आहेत.

Advertisement
Tags :

.