महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

देशात 100 हून अधिक चिनी वेबसाईट्सवर बंदी

06:05 AM Dec 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चीनविरोधात भारताची मोठी कारवाई

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

मोदी सरकारने चीनवर कडक कारवाई केली आहे. देशात चिनी गुंतवणूक घोटाळ्याच्या वेबसाईटवर बंदी घालण्यात आली असून संबंधित 100 हून अधिक वेबसाईट्सवर बंदी घालण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामुळे चीनला कोट्यावधींचे नुकसान सहन करावे लागू शकते. अनेक राज्यांनी या वेबसाईट्सविरोधात गृह मंत्रालयाकडे तक्रार केल्यानंतर हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.

गुंतवणुकीच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या अनेक चिनी वेबसाईट्सबाबत राज्यांकडून तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर बंदी घालण्याची शिफारस केली होती. गृह मंत्रालयाने त्या शिफारशींवर कारवाई करत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला संकेतस्थळांवर बंदी घालण्याची तयारी दर्शवली. या वेबसाईट्स भारतीय नागरिकांना लक्ष्य करून देशाची अर्थव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याने बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी अनेक प्रकरणे समोर आल्यानंतर मोदी सरकारने उद्योगपतींशी बोलून चिनी वेबसाईट्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गृह मंत्रालयाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला पत्र लिहून वेबसाईट ब्लॉक करण्याची शिफारस केली होती. यापूर्वी, देशात 250 चिनी अॅप्सवर बंदी घालण्यात आली होती, ज्यामध्ये टिकटॉकचा समावेश होता. चिनी मोबाईल अॅप्स देशातील संवेदनशील वापरकर्त्यांचा डेटा गोळा करत होते. तसेच ती हा डेटा चुकीच्या पद्धतीने वापरत असल्याचे निदर्शनास आले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article