यल्लम्मा देवीच्या दानपेटीत 1.48 कोटीहून अधिक रक्कम जमा
लाखो भाविकांचे सढळ हस्ते दान
वार्ताहर/बाळेकुंद्री
कर्नाटक,महाराष्ट्र व गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लमा देवीच्या मंदिराची दानपेटी शुक्रवारी खोलण्यात आली. यंदा यल्लम्मा देवीच्या भक्तांनी गेल्या साठ दिवसात 1 कोटी 48 लाखांहून अधिक रकमेचे दान रेणुकाचरणी अर्पण केले आहे. गेल्या दोन दिवसापासून सुरू झालेली मोजणी गुरुवारी पूर्ण झाली.यासाठी यल्लमा मंदिराचे शासनाधिकारी, जिल्हाधिकारी व संबंधित देवस्थानचे कार्यनिर्वाहक अधिकारी एसबीपी महेश यांनी रितसर अनुमती घेऊन दानपेटी खोलण्यात आली. या दानपेटीतील रक्कम, मौल्यवान दागिने मोजण्यात आले.
दानपेटीत 1 कोटी 48 लाख 95 हजार 404 रुपये रोख रक्कम, 11 लाख 79 हजार किमतीचे सोने, एक लाख 80 हजार रुपये किमतीचे चांदीची मोजणी करण्यात आली. गेल्या 25 मे ऑगस्टपर्यंत भाविकांनी हुंडीत दान केलेली रक्कम, सोने चांदीचे दागिने मोजण्याचे काम शुक्रवारी पूर्ण झाले आहे. यावेळी देवस्थान कार्यनिर्वाहक अधिकारी एसबीपी महेश पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, मंदिराच्या विकासाच्या पायाभूत सुविधा देण्यासाठी रक्कम वापरण्यात येणार असल्याचे सांगितले. देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बसय्या हिरेमठ, सदस्य वाय. वाय. काळप्पनावर, देवस्थानचे अभियंता ए. बी. मुळळूर, मुजराई खात्याचे साहाय्यक आयुक्त बसवराज जिरग्याळ, पॅनरा बँकेच्या कर्मचारीसह देवस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.