For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केंद्र, राज्य सरकारकडून महिला विकासावर अधिक भर

06:12 AM Mar 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
केंद्र  राज्य सरकारकडून महिला विकासावर अधिक भर
Advertisement

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन, जागतिक महिला दिनानिमित्त पणजीत ‘स्वयंपूर्णा उत्सव’ कार्यक्रम

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने नेहमीच महिला विकासाला प्राधान्य दिले. त्यासाठी विविध योजना राबवल्या. त्याचा लाभ घेऊन गोव्यासह देशभरातील महिला स्वत:चा आर्थिक, सामाजिक विकास साधत आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रतिपादन केले.

Advertisement

जागतिक महिला दिनानिमित्त पणजीतील कला अकादमीत शनिवारी आयोजित ‘स्वयंपूर्णा उत्सव’ या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, आमदार डिलायला लोबो, दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर, नियोजन व सांख्यिकी, मूल्यमापन खात्याचे संचालक विजय बी. सक्सेना आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

‘स्वयंपूर्ण गोवा’ उपक्रमाला मोठे यश 

राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा ताबा घेऊन आपल्याला येत्या 19 मार्च रोजी पाच वर्षे पूर्ण होत आहेत. या पाच वर्षांच्या काळात मुख्यमंत्री म्हणून आपण राज्यात राबवलेला सर्वात मोठा कार्यक्रम म्हणजे स्वयंपूर्ण गोवा. आतापर्यंत अनेक गोष्टींसाठी इतर राज्यांवर अवलंबून असलेल्या गोव्यातील जनतेला स्वयंपूर्ण करण्यासाठी आपण स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रम राबवला आणि काहीच वर्षांत या कार्यक्रमाला मोठे यशही मिळाले. या कार्यक्रमासाठी राज्यभर नेमलेले स्वयंपूर्ण मित्र, सरपंच, पंच आणि जनतेने सरकारला पूर्णपणे सहकार्य केल्यामुळेच अवघ्याच वर्षात हा कार्यक्रम यशस्वी ठरला. इतर राज्यांनीही या कार्यक्रमाची दखल घेतली, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

राज्यातील सर्वच घटकांची काळजी

पाच वर्षांच्या काळात मुख्यमंत्री या नात्याने आपण गोव्यातील सर्वच घटकांची काळजी घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी नारीशक्ती, युवाशक्ती, किसानशक्ती आणि गरीब कल्याण या चार गोष्टींवर काम सुरू केले आहे. राज्य सरकारनेही या चार गोष्टींना प्राधान्य देऊन या घटकांचा विकास साधण्यास सुऊवात केलेली आहे. 2014 पूर्वी देशावर राज्य केलेल्या सरकारने केवळ भाषणे देण्याचे काम केले. पण, 2014 मध्ये सत्तेवर आलेल्या मोदींनी केवळ भाषणेच दिली नाहीत, तर महिलांच्या विकासासाठी, प्रगतीसाठी अनेक महत्त्वपूर्ण अशा योजना राबवल्या. वंशाला दिवा म्हणून मुलगाच हवा अशी मानसिकता देशभरातील नागरिकांची झालेली होती. त्यातून स्त्राrभ्रूण  हत्या केली जात होती. त्यातून स्त्राr-पुऊष समतोल ढासळत चालला होता. त्यामुळे मोदींनी बेटी बचाव, बेटी पढाव अभियान सुरू केले. या अभियानाला गोव्यासह देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळेच मुलींनाही आज मुलांच्या बरोबरीने वागणूक समाजाकडून मिळत आहे. सुकन्या, उज्ज्वला, प्रधानमंत्री मुद्रा यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण योजना मोदींनी राबवल्या. मुलीच्या जन्मापासून ते तिच्या उज्ज्वल भवितव्यापर्यंतची तरतूद त्यांनी करून ठेवली. आता तर विधानसभा निवडणुकीतही महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचाही निर्णय केंद्रातील भाजप सरकारने घेऊन महिलांना राजकीयदृष्ट्याही बळकटी मिळवून दिली आहे, तसेच सीएमआरच्या सीएसआरच्या निधीतून राज्यात 3 हजार उद्योजिका तयार करण्याचे ध्येय सरकारचे आहे. असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.

महिलांची विविध क्षेत्रांमध्ये प्रगती

केंद्र सरकारच्या महिलांसंदर्भात सर्व योजनांची राज्य सरकारने गोव्यात अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे राज्यातील महिलाही विविध क्षेत्रांमध्ये प्रगती साधत आहेत. मुद्रा योजनेच्या सर्वाधिक लाभार्थी महिलाच आहेत. पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा राज्यातील अनेक महिलांनी लाभ घेतला आहे. महिला सक्षमीकरणासाठीच राज्य सरकारने लाडली लक्ष्मी, गृहआधार यासारख्या योजना राबवल्या आहेत. या सर्व योजनांचा लाभ घेऊन महिलांनी स्वत:चा आर्थिक, सामाजिक विकास साधावा, असे आवाहनही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी : डिलायला

राज्यातील महिलांच्या विकासासाठी केंद्रातील मोदी सरकार विविध मार्गांनी प्रयत्न करीत आहे. त्यामुळेच महिलांची प्रगती होत आहे. महिलांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी. स्वत:साठी वेळ काढून व्यायाम करावा, असे आवाहन आमदार डिलायला लोबो यांनी केले.

स्वयंपूर्ण गोवाच्या माध्यमातून महिलांचा विकास : श्रीपाद नाईक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचे स्वप्न पाहून त्या दिशेने काम सुरू केले आणि आतापर्यंत 25 कोटी भारतीयांना गरीबीतून मुक्त केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही राज्यातील महिलांचे जीवनमान उंचावले आहे. स्वयंपूर्ण गोवाच्या माध्यमातून त्यांनी महिलांचा विकास साधला आहे, असे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी नमूद केले.

देशाला बलवान पंतप्रधान

भाजप सरकार आल्यानंतर देशाला बलवान पंतप्रधान मिळाले. त्याचबरोबर विकसित देश निर्माण करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. देशाला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्षे पूर्ण झाली. तरीही इतकी वर्षे देशाचा आवश्यक विकास झालेला नव्हता. मोदी सरकार आल्यानंतर 2014 पासून देशाची खऱ्या अर्थाने विकासाची सुऊवात झाली.  महिला, युवा, शेतकरी, गरीब समाजासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत कार्य करत आहेत, असे श्रीपाद नाईक पुढे म्हणाले.

दरम्यान, या उत्सवात महिलांकडून पथनाट्या तसेच इतरही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातून हजारो महिला या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या होत्या.

Advertisement
Tags :

.