For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेख हसीनांवर हत्येचे आणखी गुन्हे दाखल

06:45 AM Aug 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
शेख हसीनांवर हत्येचे आणखी गुन्हे दाखल
Advertisement

कुटुंबीय, सहकारीही कायद्याच्या कचाट्यात

Advertisement

वृत्तसंस्था/ ढाका

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणीत वाढ होत असून त्यांच्यासह मंत्रिमंडळातील अन्य सहकाऱ्यांविरुद्ध हत्या किंवा खुनाचे आणखी किमान चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 2010 मध्ये बांगलादेश रायफल्स अधिकारी अब्दुर रहीम यांच्या मृत्यूप्रकरणी हसीना यांच्यासह बांगलादेश बॉर्डर गार्ड फोर्सचे माजी महासंचालक अझीझ अहमद आणि अन्य 11 जणांविरुद्ध रविवारी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Advertisement

बीडीआरचा सहाय्यक उपसंचालक राहिलेला रहीम 2010 मध्ये पिलखाना हत्याकांडप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपी होता. त्याचवषी 29 जुलै रोजी कोठडीत असतानाच त्याचा तुरुगात मृत्यू झाला. रहीम यांचा मुलगा वकील अब्दुल अजीज याने ढाका महानगर दंडाधिकारी मोहम्मद अख्तर उज्जमान यांच्या न्यायालयात हा खटला दाखल केला. तसेच 18 जुलै रोजी विद्यार्थी आंदोलनादरम्यान मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या (एमआयएसटी) विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी हसीनांसह इतर 48 जणांविरुद्ध रविवारी हत्येचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला.

देशात नवे सरकार आल्यापासून त्यांच्यावर आतापर्यंत 35 हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये 30 खून, 4 हत्याकांड आणि एका अपहरणाचा समावेश आहे. बांगलादेशातील हेफाजत-ए-इस्लाम या संघटनेचे सचिव मुफ्ती हारुण इझहर चौधरी यांनी आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणात हसीनांविरोधात तक्रार दाखल केल्याचे वृत्त बंगाली डेली स्टारने दिले आहे. हसीना यांच्यासोबतच त्यांचा मुलगा सजीब वाजिद जॉय, मुलगी सायमा वाजिद पुतुल आणि बहीण शेख रेहाना यांनाही आरोपी करण्यात आले आहे. हेफाजत-ए-इस्लामचे कार्यकर्ते 5 मे 2013 रोजी ढाका येथे ईशनिंदेविरोधात कायदा करण्याच्या मागणीसाठी निदर्शने करत असताना पोलिसांनी जमावावर बळाचा वापर केल्याने हिंसक झाले. यामध्ये 27 जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी 11 वर्षांनंतर हसीनावर नरसंहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Tags :

.