महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मूग-सूर्यफुलाची होणार हमीभावानुसार खरेदी

11:47 AM Aug 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जिह्यामध्ये नऊ ठिकाणी खरेदी केंद्रे : टास्क फोर्स समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

Advertisement

बेळगाव : केंद्र सरकारच्या 2024 हमीभाव योजनेंतर्गत एफ ए क्यू दर्जाचे सूर्यफूल उत्पादन आणि मूग खरेदी करण्यासाठी जिह्यामध्ये सदर पिकाचे उत्पादन घेणाऱ्या तालुक्याच्या ठिकाणी खरेदी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या हमीभाव योजनेनुसार सूर्यफूल पिकाला प्रति क्विंटल 7280 ऊपये तर मूग पिकाला प्रति क्विंटल 8682 ऊपयेप्रमाणे खरेदी केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा टास्क फोर्स समितीच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी सदर समितीचे अध्यक्ष असून या बैठकीमध्ये कृषी बाजार खात्याचे उपनिर्देशक आणि सदस्य उपस्थित होते. बेळगाव जिह्यामध्ये 2024-25 या वर्षातील खरीप हंगामात 2350 हेक्टर क्षेत्रामध्ये सूर्यफूल पिकाचे उत्पादन घेतले जात आहे. 47 हजार क्विंटल उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. जिह्यातील रामदुर्ग, सौंदत्ती आणि यरगट्टी तालुक्यांमध्ये या पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात आले आहे. या तालुक्यांमध्ये अधिक प्रमाणात पेरणी करण्यात आल्याने या भागातूनच अधिक आवक होण्याची शक्यता असल्याचे कृषी अधिकारी यांनी सांगितले. सध्या प्रतिक्विंटल चार हजार पाचशे ते पाच हजार ऊपये भाव असल्याची माहिती बैठकी देण्यात आली.

Advertisement

रामदुर्ग-सौंदत्ती येथे खरेदी केंद्रे 

सूर्यफूल खरेदीसाठी रामदुर्ग तालुक्यातील टी ए पी सी एम एस लिमिटेड रामदुर्ग व सौंदत्ती तालुक्यातील टी ए पी सी एम एस सौंदत्ती येथे खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. नाफेड संस्थेच्या केंद्रीय खरेदी एजन्सी आणि कर्नाटक सहकार तेल बियाणे उत्पादक महामंडळ नियमित बेंगळूर यांच्या माध्यमातून या पिकाचे उत्पादन खरेदी केले जाणार आहे. प्रति एकर प्रत्येक शेतकऱ्यांकडून तीन क्विंटलप्रमाणे 15क्विंटल एफ ए क्यू दर्जाचे सूर्यफूल उत्पादन खरेदी केले जाणार आहे. आदेश जारी केल्यानंतर शेतकऱ्यांनी 45 दिवसांमध्ये नोंदणी करावी. खरेदी करण्यासाठी 90 दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. नोंदणीबरोबरच खरेदी प्रक्रिया प्रारंभ केली जाणार आहे.

तसेच जिह्यामध्ये 2024-25 या खरीप हंगामात 39 हजार 500 हेक्टर क्षेत्रामध्ये मूग पेरणी करण्यात आली आहे. 2 लाख 47 हजार 500 क्विंटल मूग उत्पादनाचा अंदाज असून जिह्यातील बैलहोंगल, रामदुर्ग, सौंदत्ती आणि यरगट्टी या तालुक्यांमध्ये अधिक प्रमाणात पेरणी करण्यात आली आहे. सध्या 6000 ते 7000 ऊपये प्रति क्विंटल भाव आहे. केंद्र सरकारच्या हमीभाव योजनेनुसार दर्जेदार मुगाला प्रति क्विंटल 8682 ऊपये भाव देण्यात येणार आहे. त्यासाठी नियम व अटी लागू असणार असल्याचे कृषी विक्री खात्याच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. आदेश जारी केल्यानंतर 45 दिवसांमध्ये शेतकऱ्यांनी नोंदणी करावी व खरेदीसाठी 90 दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. प्रत्येक शेतकऱ्याकडून दोन क्विंटल प्रमाणे अधिक तर दहा क्विंटल मूग खरेदी केला जाणार आहे.

मूग खरेदीसाठी जिह्यामध्ये सात ठिकाणी सोय 

हमीभाव योजनेंतर्गत जारी करण्यात आलेल्या मार्गसूचीचे पालन करणे आवश्यक आहे. खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या नावाने व्यापारी सदर पिकांची विक्री करू शकतात, यावेळी अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे व याचा दुऊपयोग होऊ नये याची खबरदारी घेण्याची सूचनाही जिल्हाधिकारी यांनी केली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article