सुंदर छटा असणारी मॉन्युमेंट व्हॅली
आकर्षक लाल बलुआ दगडाच्या संरचनांसाठी ओळखले जाणारे एक ठिकाण अनेक चित्रपट, टीव्ही शो आणि जाहिरातींचा हिस्सा ठरले आहे. हे केवळ आकर्षक दृश्यासाठी नव्हे तर नैसर्गिक, भूवैज्ञानिक आणि ऐतिहासिक कारणांसाठी देखील ओळखले जाते. एरिजोना-यूटा सीमेवरील मॉन्युमेंट व्हॅली अमेरिकेत सर्वाधिक ओळखल्या जाणाऱ्या नैसर्गिक दृश्यांपैकी एक आहे. याच्या उंच बलुआ दगडाच्या संरचनांनी अनेक लोकांच्या कल्पनेला भरारी दिली आहे. मॉन्युमेंट व्हॅली कोलोराडो पठाराचा हिस्सा आहे, जे स्वत:च्या दंग करणाऱ्या भूवैज्ञानिक संरचनांसाठी ओळखले जाते.
या खोऱ्याचे वैशिष्ट्या याच्या लाल बलुआ दगडाच्या संरचना असून त्यातील काही खोऱ्याच्या तळापासून 1 हजार फुटांपर्यंत उंच आहेत. मॉन्युमेंट व्हॅलीचे अनोखे दृश्य लाखो वर्षांच्या नैसर्गिक क्रियांमुळे अस्तित्वात आले आहे. मॉन्युमेंट व्हॅलीचे मोठे सांस्कृतिक महत्त्व देखील आहे. मॉन्युमेंट व्हॅली नवाजोसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असून त्याच्याकडून या क्षेत्राचे व्यवस्थापन केले जाते. मॉन्युमेंट व्हॅलीसाठी नवाजो नाव ‘त्से ािब्इ एनदिस्गई’ असून याचा अर्थ ‘पर्वतांचे खोरे’ असा होतो. या खोऱ्याला नवाजो लोक एक पवित्र स्थान मानतात, नवाजो लोक या क्षेत्रात शतकांपासून राहत आले आहेत. याचमुळे आजही येथे पारंपरिक नवाजो समारंभ आणि विधी केले जातात.
मॉन्युमेंट व्हॅली दशकांपासून हॉलिवूडच्या दिग्दर्शकांसाठी पसंतीचे ठिकाण राहिले आहे. या खोऱ्याला जॉन फोर्ड यांच्या ‘स्टेजकोच’ (1939) समवेत अनेक क्लासिक पाश्चिमात्य चित्रपटांमध्ये दर्शविण्यात आले आहे. मॉन्युमेंट व्हॅली ‘फॉरेस्ट गंप’, ‘बॅक टू द फ्यूचर पार्ट 2’ आणि ‘द लोन रेंजर’ यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसून आली आहे. या भागाला विविध टेलिव्हिजन शो, जाहिराती आणि संगीत व्हिडिओंमध्ये देखील दाखविण्यात आले आहे.
मॉन्युमेंट व्हॅलीचे नैसर्गिक सौंदर्य प्रत्यक्षात विस्मयकारक आहे. खोऱ्यातील सर्वात प्रसिद्ध संरचनांमध्ये मिटेंस, मेरिक बट आणि टोटेम पोल सामील आहे. मॉन्युमेंट व्हॅलीचा लाल रंग आयर्न ऑक्साइडमुळे प्राप्त झाला आहे. तर निळा-करड्याच्या रंगाचे पर्वत मॅगनीज ऑक्साइडमुळे प्राप्त झाले आहेत. हे क्षेत्र विविध प्रकारच्या वन्यजीवांचे घर असून यात कोयोट, बॉबकॅट आणि गोल्डन ईगल सामील आहे.
मॉन्युमेंट व्हॅली पर्यटकांच्या मनोरंजनासाठी अनेक प्रकारच्या हालचाली आणि अनुभव प्रदान करते. पर्यटक नवाजो गाइडच्या नेतृत्वात तेथे फिरू शकतात, जे क्षेत्राचा इतिहास आणि संस्कृतीविषयी ज्ञान पुरवित असतात. 17 मैलाची व्हॅली ड्राइक्ह पर्यटकांना कारमधून खोऱ्यातील विस्मयकारक दृश्य पाहण्याची संधी देते. मॉन्युमेंट व्हॅली फोटोग्राफरांसाठी देखील एक लोकप्रिय स्थळ आहे.