महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कर्नाटक किनारपट्टीवर मान्सून दाखल

06:21 AM Jun 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हवामान खात्याकडून 14 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट : बेळगावसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

राज्यातील शेतकरी वर्गाला आनंदाची बातमी मिळाली असून अपेक्षेप्रमाणे रविवारी कर्नाटकाच्या किनारपट्टी भागामध्ये मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळे बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाऊस पडत आहे. हवामान खात्याने 14 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जाहीर केला आहे. पुढील 24 तासांसाठी किनारपट्टी भागातील मंगळूर, उत्तर कर्नाटक भागातील बागलकोट, कोप्पळ, रायचूर, विजापूर, यादगिरी, दक्षिण भागातील बेंगळूर ग्रामीण, बेंगळूर शहर, चिक्कबळ्ळापूर, चित्रदुर्ग, हासन, मंड्या, म्हैसूर, तुमकूर जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.बेंगळूर ग्रामीण, बेंगळूर शहर, चिक्कबळ्ळापूर, चिक्कमंगळूर, चित्रदुर्ग, मंड्या, म्हैसूर, तुमकूर जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पाऊस होणार आहे. 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. याचबरोबर बागलकोट, कोप्पळ, रायचूर, विजापूर, यादगिरी जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडेल. मंगळूर जिल्ह्याच्या काही भागात जोरदार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. बेळगाव, कारवार, धारवाड, गदग, हावेरी, बिदर, कलबुर्गी, उडुपी, बळ्ळारी, चामराजनगर, चिक्कमंगळूर, दावणगेरे, हासन, कोडगू, कोलार, रामनगर, शिमोगा, विजयनगर जिल्ह्यासह अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्मयता आहे. पुढील 48 तासांत कमाल आणि किमान तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होण्याची शक्मयता आहे. बेंगळूर शहर आणि आसपासच्या भागात पुढील 24 तास ढगाळ वातावरण राहील. काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 30 अंश आणि 20 अंश राहण्याचा अंदाज आहे. मान्सूनने बेंगळूर शहरासह दक्षिण कर्नाटकचा बहुतांश भाग व्यापला आहे.

 रविवारी बेंगळूरला पावसाने पुन्हा झोडपले

बेंगळूर शहराला रविवारी सायंकाळी पुन्हा मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. परिणामी, शहरातील बहुतांश रस्ते जलमय झाले आहेत. दरम्यान, मेट्रो ट्रॅकवर झाड पडल्यामुळे इंदिरानगर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. केरळमध्ये मान्सूनच्या आगमानानंतर राजधानी बेंगळुरात जोरदार पाऊस पडत आहे. शनिवारीही जोरदार पाऊस झाला होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article