भिक्षू मांजर, ध्यानाद्वारे ज्ञानग्रहण
पोशाख अन् चष्मा करतोय दंग
एका मांजराने सध्या इंटरनेटवर मोठी प्रसिद्धी मिळविली आहे. एका व्हिडिओत एक मांजर एका बौद्ध साधूकडून धार्मिक शिक्षण घेताना दिसून आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘थायलंडमध्ये एक बौद्ध मांजराला धर्माचे शिक्षण घेताना पाहणे सर्वात चांगली गोष्ट असल्याचे’ नमूद करण्यात आले आहे. या जिंजर कॅटने भिक्षूंच्या पोशाखासोबत एक छोटा चष्माही परिधान केला आहे.
हे मांजल केवळ भिक्षूकडे बसलेले नसून भिक्षू त्याचा हात पकडून त्याला शिक्षण देत आहे, तर मांजर असूनही ते शांतपणे बसलेले दिसून येते. काही लोकांना या व्हिडिओवर विश्वासच बसलेला नाही. तर पाळीव मांजरांचे बौद्ध भिक्षूंमध्ये खास महत्त्व आहे. हे अशाप्रकारचे एकमात्र मंजर नसून अशी अनेक मांजर कुठल्या न कुठल्या भिक्षूसोबत दिसून येतात.
थायलंडमध्ये जो खोडकर भिक्षू स्वत:च्या प्रतिज्ञा पूर्ण करत नाही तो मांजरांच्या रुपात पुनर्जन्म घेतो असे मानले जाते. मांजर पिढ्यान पिढ्या प्रत्येक जन्मात बौद्ध धर्माच्या स्वत:च्या अंतिम ज्ञानाच्या लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचेही मानले जाते.