For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

28 मार्चपासून त्याच दिवशी खात्यात जमा होणार पैसे

06:30 AM Mar 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
28 मार्चपासून त्याच दिवशी खात्यात जमा होणार पैसे
Advertisement

माधवी बुच यांची माहिती: गुंतवणूकदारांना होणार लाभ: टी अधिक 0 प्रणाली होणार कार्यरत

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

28 मार्चपासून शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना समभागांच्या विक्रीनंतर त्याच दिवशी त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याची महत्त्वाची घोषणा सेबीच्या चेअरमन माधवी पुरी बुच यांनी केली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडियाच्या एका कार्यक्रमामध्ये त्यांनी ही गुड न्युज समस्त शेअरबाजारातील गुंतवणूकदारांकरीता दिली आहे.

Advertisement

काय आहे प्रणाली

नव्या टी अधिक 0 (ऊ+0) प्रणाली अंतर्गत गुंतवणूकदारांना 28 मार्चपासून पर्याय स्वीकारलेल्यांना त्याच दिवशी समभाग विक्री केल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. टी अधिक 0 व्यवहाराचा पर्याय ऐच्छिक असणार आहे. 28 मार्चनंतर गुंतवणूकदारांना टी अधिक 0 किंवा टी अधिक 1 या दोनपैकी एका प्रणालीची निवड करावी लागणार आहे. सध्याला भारतामध्ये टी अधिक 1 ही सेटलमेंटची प्रणाली लागू आहे. या प्रणाली अंतर्गत गुंतवणूकदाराला समभाग विक्रीनंतर त्याच्या खात्यामध्ये दुसऱ्या दिवशी रक्कम जमा होते. म्हणजेच रक्कम जमा होण्यासाठी एक दिवस लागत असल्याने तिचे नाव टी अधिक 1 असे ठेवले आहे.

इन्स्टंट सेटलमेंट प्रणाली

महिला फंड व्यवस्थापकांचा सत्कार सेबीच्या प्रमुख माधवी बुच यांच्या हस्ते करण्यात आला. गुंतवणूकदारांचे पैसे तात्काळ खात्यामध्ये जमा होणारी इन्स्टंट सेटलमेंट प्रणाली पूर्णपणे कार्यरत होण्यासाठी 2025 पर्यंत थांबावे लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले. इन्स्टंट सेटलमेंट ही प्रणाली कार्यरत झाल्यानंतर गुंतवणूकदारांना खरेदी किंवा विक्रीनंतरची रक्कम तातडीने त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. भारतीय शेअर बाजारामधील नियामक सेबी या संस्थेने बाजारात समभाग खरेदी व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासोबतच व्यवहारांना अधिक गती देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यावर भर दिला आहे. मार्च अखेरपर्यंत टी अधिक 0 सेटलमेंट प्रणाली लागू केली जाण्याची शक्यता आहे.

चीननंतर भारतात होणार लागू

चीन सध्याला टी अधिक 0 सेटलमेंट प्रणालीचा वापर करत आहे. आता भारतही ही प्रणाली वापरु लागेल.

यांना होणार आधी फायदा

सेबी या संस्थेने मागच्या वर्षीच टी अधिक 0 सेटलमेंट प्रणाली लागू करण्याबाबत सूचना जारी केली होती. याअंतर्गत बाजार भांडवलात सध्याला आघाडीवरच्या 500 कंपन्यांसाठी नवी प्रणाली जारी केली जाणार आहे. तीन टप्प्यांमध्ये ही नवी प्रणाली लागू होणार असल्याचेही सेबीने म्हटले आहे. सर्वात कमी बाजार भांडवल असणाऱ्या 200 कंपन्यांना याचा फायदा सुरुवातीला होणार आहे. त्यानंतर त्यापेक्षा कमी बाजार भांडवल असणाऱ्या कंपन्यांना याचा फायदा होणार आहे.

Advertisement
Tags :

.