For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

विद्यापीठासह शाळा-महाविद्यालयांना सोमवारी सुट्टी; शासनाच्या वतीने परिपत्रक जाहीर

08:26 PM Jan 20, 2024 IST | Abhijeet Khandekar
विद्यापीठासह शाळा महाविद्यालयांना सोमवारी सुट्टी  शासनाच्या वतीने परिपत्रक जाहीर
Shivaji University

कोल्हापूर प्रतिनिधी

आयोध्येमध्ये सोमवार 22 जानेवारी रोजी राम लल्ला प्राण-प्रतिष्ठा होणार असल्याने सरकारच्या वतीने विद्यापीठासह शाळा-महाविद्यालयांना सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठ अंतर्गत सर्व अधिविभाग, महाविद्यालय व प्रशासकीय कामकाज बंद राहणार आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी आहे. याची दखल सर्व शैक्षणिक संस्था, शिक्ष्हाक आणि विद्यार्थ्यांनी घ्यावी, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

Advertisement

राम लल्ला प्राण-प्रतिष्ठापना कार्यक्रमात सर्वांना सहभागी होता यावे यासाठी राज्यशासनाने सर्व शाळा-महाविद्यालयांसह सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठासह जिल्हा शिक्षण विभागाने परिपत्रक जाहीर करून शाळा-महाविद्यालयांना सुट्टी असल्याचे कळवले आहे. शाळांनीही सूचना फलकासह व्हॉटसअॅप ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सुट्टीच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे सर्वांनी आपआपल्या शहर, गावातील राम लल्ला प्राण-प्रतिष्ठापना कार्यक्रमात सहभागी व्हायचे आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
×

.