For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara Police : अवघ्या 3 तासांत विनयभंगाचा आरोपी जेरबंद, शिरवळ पोलीसांची तात्काळ कारवाई

05:52 PM May 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
satara police   अवघ्या 3 तासांत विनयभंगाचा आरोपी जेरबंद  शिरवळ पोलीसांची तात्काळ कारवाई
Advertisement

फिर्यादीच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला

Advertisement

शिरवळ : शिरवळ पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात आलेल्या विनयभंगाच्या गंभीर प्रकरणात पोलिसांनी अवघ्या तीन तासांत आरोपीला अटक करत कायद्याचा धाक दाखवला. आरोपीने एका महिलेच्या अंगाला हात लावून अश्लील इशारे करत तिला छेडण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना साई सुपरमार्केट, शिरवळ परिसरातील कच्च्या रस्त्यावर घडली.

आरोपी शुभम दिलीप गुळमे (वय २४, रा. शिर्के कॉलनी, शिरवळ) याने तोंडावर मास्क लावून मोटरसायकलवरून फिर्यादी महिलेच्या अंगाला स्पर्शक करुन अश्लील इशारे करत घटनास्थळावरून पसार झाला. या धक्कादायक प्रकारानंतर फिर्यादीच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Advertisement

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, तसेच फलटण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी तत्काळ संपूर्ण यंत्रणा अलर्ट केली. पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली.

तपासादरम्यान गोपनीय बातमीदारांच्या मदतीने संशयिताचे नाव निष्पन्न झाले. लगेचच त्याचा माग काढत पोलिसांनी आरोपी शुभम गुळमेला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबूली दिली असून, गुन्ह्यात वापरलेली त्याची मोटरसायकलही जप्त करण्यात आली आहे.

विशेष बाब म्हणजे, आरोपीने यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना केल्या असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शिरवळ पोलीस ठाण्याने सर्व महिलांना आवाहन केले आहे, जर कोणत्याही महिलेसोबत यापूर्वी अशा प्रकारचा त्रास झाला असेल, तर त्यांनी महिला पोलीस उपनिरीक्षक नयना कामथे किंवा सपना दांगट यांच्याशी संपर्क साधावा.

संबंधित माहिती गोपनीय ठेवली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या कामगिरीसाठी पोलीस अधीक्षक, अपर अधीक्षक व उपविभागीय अधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, महिला पो.उ.नि. नयना कामथे, स.पो.फौ. विलास यादव आणि त्यांच्या पथकाचे अभिनंदन केले आहे.

सतर्क राहा, सुरक्षित राहा!

शिरवळ पोलीस स्टेशनच्या दक्षतेमुळे अश्लील कृत्य करणाऱ्या विकृत मानसिकतेच्या व्यक्तीला चटकन अटक झाली असून, पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की, गुन्हेगार कुठेही लपला तरी कायद्याच्या विळख्यातून सुटू शकत नाही!

Advertisement
Tags :

.