महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मोहन बागान उपांत्य फेरीत

06:21 AM Aug 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था /जमशेदपूर

Advertisement

2024 च्या ड्युरँड चषक फुटबॉल स्पर्धेत कोलकाताच्या बलाढ्या मोहन बागान संघाने येथे खेळविण्यात आलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पंजाब एफसीचा पेनल्टीमध्ये 6-5 अशा गोलफरकाने पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला.

Advertisement

बागान आणि पंजाब यांच्यातील हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगला. येथील टाटा क्रीडा संकुलाच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी वेगवान आणि तंत्रशुद्ध खेळावर अधिक भर दिला. निर्धारीत वेळेत दोन्ही संघ 3-3 असे बरोबरीत होते. त्यानंतर पंचांनी पेनल्टी शुटआऊटचा अवलंब केला. पेनल्टी शूटआऊटमध्ये बागानने 3 गोल तर पंजाबने 3 गोल केल्याने पंजाबचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

या सामन्याला प्रारंभ झाल्यानंतर पूर्वार्धात लुका मॅजसेनने पेनल्टीवर पंजाब एफसीचे खाते उघडले. त्यानंतर सुहेल भाटने मध्यंतराला केवळ 2 मिनीटे बाकी असताना बागानला बरोबरी साधून दिली. सामन्याच्या उत्तराधार्थ मनवीरसिंगने बागानचा दुसरा गोल केला. त्यानंतर फिलीप मिझेक आणि व्हिडाल यांनी पंजाबतर्फे आणखी दोन गोल केले. 19 व्या मिनीटाला जेसन कमिंग्जने बागानचा तिसरा गोल नोंदवून सामन्याला अधिकच रंगत आणली. निर्धारीत वेळेत दोन्ही संघ 3-3 असे बरोबरीत राहिले. पेनल्टी शूटआऊटमध्ये पहिल्या फटक्यावर बागानच्या  कमिंग्जला गोल नोंदविता आला नाही. पण पंजाबने पहिल्या फटक्यावर गोल केला. त्यानंतर बागानच्या गोलरक्षकाने पंजाबचा दुसरा फटका अडविला. स्टिवर्टने बागानच्या दुसऱ्या फटक्यावर गोल केला. त्यानंतर सडनडेथमध्ये पंजाबतर्फे मेट्रॉय अॅसेसीने तसेच सुभाषीश बोसने गोल केले. त्यानंतर पंजाबच्या थॉमस अलड्रेडने मारलेला फटका बागानच्या गोलरक्षकाने अडविला. तसेच मेताईचा फटकाही बागानच्या गोलरक्षकाने अडविल्याने अखेर मोहन बागानने हा सामना पेनल्टीमध्ये 6-5 असा जिंकून पंजाबचे आव्हान संपुष्टात आणले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article