For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोहसिनला वॉटर स्पोर्ट्स स्पर्धेत पहिले सुवर्णपदक

06:06 AM Aug 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
मोहसिनला वॉटर स्पोर्ट्स स्पर्धेत पहिले  सुवर्णपदक
Advertisement

वृत्तसंस्था/ जम्मू काश्मीर

Advertisement

खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिव्हलच्या पहिल्या आवृत्तीची सुरुवात स्थानिक शिकारवाला मोहसिन अलीने या खेळातील पहिले सुवर्णपदक जिंकून सुरुवात केली आहे. या स्पर्धेत 17 वर्षीय मोहसिन, जो दाल लेकमध्ये शिकारवाला म्हणूनही काम करतो, त्याने 1000 मीटर पुरुष एकेरी कायाकिंग शर्यतीत 4:12.41 वेळ नोंदवून ओडिशाच्या नौरम जेम्स सिंग (4:14.68) आणि मध्य प्रदेशच्या मयंक (4:23.28) यांच्यापेक्षा जास्त वेळ नोंदवत राष्ट्रीय स्तरावरील पहिले सुवर्णपदक जिंकले.

कॅनोइंग आणि कायकिंग स्पर्धेत आणखी दोन सुवर्णपदके निश्चित झाली असून यामध्ये उत्तर प्रदेशच्या विशाल कुमारने कॅनो एकेरीमध्ये अव्वल पारितोषिक जिंकले. 1000 मीटर शर्यतीसाठी, विशालने 4:30.59 वेळ नोंदवली. मध्य प्रदेशच्या कृष्णा जाटने (4:31.36) रौप्यपदक पटकावले तर जम्मू आणि काश्मीरच्या मोहम्मद हुसेनने 4:32.83 सेकंद वेळेसह कांस्यपदक पटकावले.

Advertisement

महिलांसाठीच्या दिवसाच्या एकमेव अंतिम फेरीत, ओडिशाच्या रस्मिता साहूने 200 मीटर कॅनो एकेरी स्पर्धेत 53.53 सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले. केरळच्या नक्षत्र संतोष (53.83) आणि मध्य प्रदेशच्या मासुमा यादव (54.26) यांनी रौप्य आणि कांस्यपदक जिंकले.

तत्पूर्वी, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे या स्पर्धेचे उद्घाटन केले. या समारंभाला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे उपस्थित होत्या. जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि जम्मू-काश्मीरचे क्रीडा मंत्री सतीश शर्मा देखील उपस्थित होते. 23 ऑगस्ट रोजी संपणाऱ्या या तीन दिवसांच्या स्पर्धेत 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 500 हून अधिक खेळाडू पाच स्पर्धांमध्ये भाग घेतील. रोइंग, कॅनोइंग आणि कायकिंगमध्ये 24 पदके जिंकण्यासाठी असतील, तर शिकारा स्प्रिंट, ड्रॅगन बोट रेस आणि वॉटर स्कीइंग हे प्रात्यक्षिक कार्यक्रम असतील.

Advertisement
Tags :

.