For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोहनगा यात्रेतून परिवहनला 6 लाखांचे उत्पन्न

10:41 AM Feb 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
मोहनगा यात्रेतून परिवहनला  6 लाखांचे उत्पन्न
Advertisement

यात्रा विशेष बससेवेला प्रतिसाद : परिवहनला दिलासा

Advertisement

प्रतिनिधी / बेळगाव

मोहनगा-दड्डी यात्रेसाठी सोडण्यात आलेल्या यात्रा अतिरिक्त बससेवेतून परिवहनला 6 लाखांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या परिवहनला काहिसा दिलासा मिळाला आहे. मध्यवर्ती बसस्थानकातून 14 15 फेब्रुवारी रोजी दड्डी मोहनगा यात्रेसाठी जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. या बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला असून परिवहनला अपेक्षित महसूल मिळाला आहे.

Advertisement

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मोहनगा-दड्डी येथील भावेश्वरी यात्रेला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. शिवाय बेळगाव परिसरातून यात्रेला जाणाऱ्या भक्तांची संख्या अधिक आहे. यासाठी परिवहनने यात्रा काळात बेळगाव-दड्डी मार्गावर यात्रा विशेष बससेवेची व्यवस्था केली होती. या बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला आहे. या मार्गावर फुल तिकीट 90 रुपये तर हाफ 45 रुपये आकारण्यात आले होते. विशेषत: महिलांना शक्ती योजनेंतगृ मोफत प्रवास देण्यात आला होता.

पहिल्या दिवशी 20 बस धावल्या

मोहनगा-दड्डी यात्रेसाठी जादा बस सोडण्यात आल्या होत्या. गतवर्षी या यात्रेतून 7 लाखांचा महसूल मिळाला होता. यंदा या यात्रेतून 6 लाखांचा महसूल प्राप्त झाला आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी 20 बस मोहनगा-दड्डीला मार्गावर धावल्या होत्या.

- . वाय. शिरगुप्पीकर-डेपो मॅनेंजर

Advertisement
Tags :

.