मोहन मोरे, सिनिअर 60 इलेव्हन संघ विजयी
साईराज चषक अखिल भारतीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी/बेळगाव
साईराज स्पोर्टस क्लब आयोजित साईराज चषक अखिल भारतीय निमंत्रितांच्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून बालाजी स्पोर्टस हलगाने वामिका कॅम्प संघाचा, मोहन मोरे संघाने नानावाडी सुपरकिंग्जचा, सिनिअर 60 इलेव्हनने व्हीसीसीचा तर मोहन मोरेने बालाजी स्पोर्ट्स हलगा संघाचा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला. चंदन तलवार, रोहित यादव, लक्ष खतायत, ओम पांडे यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आले. व्हॅक्सिन डेपो मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात वामिका कॅम्प संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 5 गडी बाद 67 धावा केल्या. त्यात रवी जयरामने 2 षटकारसह नाबाद 43 धावा केल्या. बालाजीतर्फे चंदन तलवारने 3 गडी बाद केले. त्यानंतर बालाजी स्पोर्ट्स हलगाने 5.1 षटकात 3 गडी बाद 68 धावा करून सामना 7 गड्यांनी जिंकला. चंदन तलवारने 3 षटकारासह नाबाद 21, इरण्णाने 17 तर प्रविणने 15 धावा केल्या. वामिकातर्फे ज्ञानेशने 2 गडी बाद केले.
दुसऱ्या सामन्यात नानावाडी सुपरकिंग्जने प्रथम फलंदाजी करताना 7.5 षटकात सर्वगडी बाद 39 धावा केल्या. त्यात किरणने 10 धावा केल्या. मोहन मोरेतर्फे रोहित यादवने 4 धावात 3, राहुल जे व अमान यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना मोहन मोरे इलेव्हनने 3.1 षटकात 1 गडी बाद 41 धावा करून सामना 9 गड्यांनी जिंकला. त्यात अभिषेक व मुझमिलने 2 षटकारासह नाबाद प्रत्येकी 17 धावा केल्या. नानावाडीतर्फे सुजितने 1 गडी बाद केला. तिसऱ्या सामन्यात सिनिअर 60 इलेव्हनने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 3 गडी बाद 93 धावा केल्या. लक्ष खतायतने व दिनेश यांनी प्रत्येकी दोन षटकारासह नाबाद 21 धावा केल्या. व्हीसीसीतर्फे बेंजामिनने 2 तर विकीने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना व्हीसीसीने 8 षटकात 3 गडी बाद 93 धावा केल्या. रवीने 1 षटकारासह 32 नेहेमियाने 4 चौकारासह 24 धावा केल्या. सिनिअरतर्फे विशालने 2 गडी बाद केले.
चौथ्या सामन्यात बालाजी स्पोर्ट्स हलगाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 5 गडी बाद 74 धावा केल्या. त्यात प्रविणने 4 षटकारास नाबाद 46 तर चंदन तलवारने 12 धावा केल्या. मोहन मोरेतर्फे रोहित यादवने 14 धावात 3 तर अमनने 1 गडी बाद केला. त्यानंतर मोहन मोरेने 4.5 षटकात 3 गडी बाद 78 धावा करून सामना 7 गड्यांनी जिंकला. त्यात ओम पांडेने 4 षटकार, 1 चौकारासह नाबाद 34, मेहुलने 3 षटकार, 2 चौकारांसह नाबाद 29 तर अभिषेकने 10 धावा केल्या. बालाजीतर्फे सचिनन 2 तर राजने 1 गडी बाद केला. प्रथमेश पवार, बंटी बद्रीके, विशाल शहा, जीवीत म्हात्रे, सुमित डोंगरे, हिमांनशू पाटील, साहिल लोंगाळे, मुकेश दास हे खेळाडू शनिवारच्या सामन्यात खेळणार आहेत.
शनिवारचे सामने
- वक्रतुंड स्पोर्ट्स वि. ग्रामीण मराठा स्पोर्ट्स सकाळी 9 वा.
- प्रथमेश मोरे स्पोर्ट्स वि. सिनिअर 60 इलेक्हन सकाळी 11 वा.
- राजमुद्रा स्पोर्ट्स मंडोळी वि. सल्हा स्पोर्ट्स दुपारी 1 वा.
- पहिल्या व दुसऱ्या सामन्यातील विजयी संघातील सामना दुपारी 3 वा.