मोहन मोरे,गो-गो,पांडुरंग सीसी उपांत्य फेरीत
साईराज चषक क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : साईराज चषक दहाव्या अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यातून मोहन मोरे इलेव्हन संघाने निल बॉईज हिंडलगा संघाचा 24 धावांनी, गोगो स्पोर्ट्सने मराठा स्पोर्ट्सचा 37 धावांनी तर पांडुरंग सीसी संघाने प्रथमेश मोरे संघाचा केवळ एक धावेने पराभव करुन उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आकाश सरेकर, साहील सावंत, प्रज्योत हंबीरे यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
व्हॅक्सिनडेपो मैदानावर पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात मोहन मोरे इलेव्हनने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 7 गडी बाद 96 धावा केल्या. नागेशने 1 षटकार 4 चौकारासह 28, ओमकारने 2 षटकार 2 चौकारासह 22 तर राकेशने 16 धावा केल्या. निल बॉईजतर्फे तनिष्क नाईकने 2, अमरीशने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना निल बॉईजने 8 षटकात 9 गडी बाद 72 धावा केल्या. आकाशने 4 षटकारासह 28, मोहीतने 11 धावा केल्या. मोहन मोरेतर्फे प्रज्योत हंबीरने 9 धावांत 3, साहील व आकाश यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
तिसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पांडुरंग सीसीने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 7 बाद 103 धावा केल्या. आकाश सरेकरने 7 षटकार, 4 चौकार 20 चेंडूत नाबाद 64, दर्शने 20 धावा केल्या. प्रथमेश मोरेतर्फे संदीपने 11 धावांत 3 तर पृथ्वीराज व रोहीतने प्रत्येकी 2 गडी बाद केले. त्यानंतर प्रथमेश मोरेतर्फे 8 षटकांत 5 गडी बाद 102 धावा केल्या. हा सामना पांडुरंग सीसीने केवळ एका धावेने जिंकला. दत्तूने 10 चौकारासह नाबाद 41, जीवीतने 4 षटकारासह नाबाद 32 धावा केल्या. पांडुरंग सीसीतर्फे मुकरबने 21 धावांत 3 तर झायओने 5 धावांत 2 गडी बाद केले.
आजचे सामने
- चौथा उपांत्यपूर्व एसआरएस हिंदुस्थान वि. के.आर.शेट्टी मंगाई सकाळी 9 वाजता
- मोहन मोरे वि. गो-गो स्पोर्ट्स यांच्यात उपांत्य फेरीचा सामना सकाळी 11 वाजता
- पहिल्या सामन्यातील विजेता वि. पांडुरंग सीसी दुपारी 2 वाजता