मोहम्मद शमीचे कमबॅक
इंग्लंडविरुद्ध टी 20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
वृत्तसंस्था/ मुंबई
इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या टी 20 मालिकेसाठी भारतीय संघाची निवड झाली असून, यामध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने पुनरागमन केले आहे. गेल्या वर्षभरापासून घोट्याच्या दुखापतीमुळे शमी भारतीय संघाबाहेर होता. तब्बल 14 महिन्यानंतर तो भारतीय संघातून खेळताना दिसणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात 16 सदस्यीय संघाची घोषणा शनिवारी बीसीसीआयने केली. आगामी काळातील व्यस्त वेळापत्रक पाहता अनुभवी जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराज यांना विश्रांती देण्यात आली आहे. उभय संघात पहिला टी 20 सामना दि. 22 जानेवारी रोजी कोलकाता येथे खेळवण्यात येईल.
टीम इंडियाचा दिग्गज गोलंदाज मोहम्मद शमी वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये आपला शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर घोट्याच्या दुखापतीमुळे त्याला वर्षभर संघाबाहेर रहावे लागले होते. मागील दोन-तीन महिन्यापासून तो भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नशील होता. आता, इंग्लंडविरुद्ध टी 20 मालिकेसाठी त्याला भारतीय संघात स्थान मिळाले आहे. दुसरीकडे, जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे टी 20 मालिकेत खेळणार नाही तर मोहम्मद सिराजलाही विश्रांती देण्यात आल्याचे बीसीसीआयकडून सांगण्यात आले.
पंतला वगळले, अक्षर पटेल व्हाईस कॅप्टन
निवड समितीने संघात यष्टीरक्षक म्हणून संजू सॅमसनला पहिली पसंती दिली आहे. तर, दुसरा यष्टीरक्षक म्हणून ध्रुव जुरेलची निवड केली आहे. अनुभवी ऋषभ पंतला मात्र या मालिकेतून वगळण्यात आले आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत छाप सोडणाऱ्या अष्टपैलू नितीश कुमार रे•ाrला देखील या टी-20 संघात स्थान दिले आहे. याशिवाय, निवड समितीने अक्षर पटेलवर मोठी जबाबदारी देताना त्याला या मालिकेसाठी व्हाईस कॅप्टन केले आहे.
शिवम दुबे, अभिषेक शर्मा संघाबाहेर, जैस्वालला संधी
दरम्यान युवा फलंदाज अभिषेक शर्मा, रमणदीप सिंग आणि शिवम दुबेला वगळण्यात आले असून, त्यांच्या जागी अनुक्रमे यशस्वी जैस्वाल, हर्षित राणा आणि नितीश कुमार रे•ाr यांना संधी देण्यात आली आहे. सुर्यकुमार यादवकडे नेतृत्वाची धुरा कायम ठेवण्यात आली आहे. उभय संघात 22 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत पाच सामने कोलकाता, चेन्नई, राजकोट, पुणे व मुंबई येथे खेळवण्यात येणार आहेत.
इंग्लंडविरुद्ध टी 20 मालिकेसाठी भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रे•ाr, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर आणि ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक).
भारत व इंग्लंड टी 20 मालिकेचे वेळापत्रक
पहिला सामना, 22 जाने. - कोलकाता
दुसरा सामना, 25 जाने - चेन्नई
तिसरा सामना, 28 जाने - राजकोट
चौथा सामना, 31 जाने - पुणे
पाचवा सामना, 2 फेब्रु - मुंबई