तेलंगणा सरकारमध्ये मोहम्मद अझरुद्दीन मंत्री
रेवंत रेड्डी सरकारमधील पहिले मुस्लीम मंत्री : हैदराबादमध्ये शपथविधी
► वृत्तसंस्था/ हैदराबाद
तेलंगणातील रेवंत रे•ाr यांच्या मंत्रिमंडळातील पहिले मुस्लीम मंत्री मोहम्मद अझरुद्दीन यांनी शुक्रवारी तेलंगणा सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहम्मद अझरुद्दीन यांनी शुक्रवारी तेलंगणा मंत्रिमंडळात मंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवन येथे झालेल्या समारंभात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. अखेर अझरुद्दीन यांनी जय तेलंगणा आणि जय हिंदचे नारे देत अल्लाहच्या नावाने शपथ घेतली.
मुख्यमंत्री ए. रेवंत रे•ाr, उपमुख्यमंत्री मल्लू भट्टी विक्रमारका, इतर मंत्री, सभापती आणि टीपीसीसीचे वरिष्ठ नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. तसेच अलिकडेच टीपीसीसीचे सरचिटणीस म्हणून नियुक्त झालेले अझरुद्दीन यांचे पुत्र मोहम्मद असदुद्दीन देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री रेवंत रे•ाr यांच्या मंत्रिमंडळातील अझरुद्दीन हे पहिले मुस्लीम मंत्री ठरले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून मंत्रिमंडळात एकही मुस्लीम मंत्री नसल्याबद्दल सत्ताधारी काँग्रेस पक्षावर टीका होत होती. दरम्यान, भाजपने निवडणूक आयोगाला मंत्रिमंडळ विस्तार रोखण्याची विनंती केली आहे. पोटनिवडणुकीत मतदारांच्या एका विशिष्ट गटाला खूश करण्यासाठी अझरुद्दीनला मंत्री बनवले जात असल्याचा दावा करत हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचा युक्तिवाद भाजपने केला आहे.
ऑगस्टमध्ये राज्य मंत्रिमंडळाने राज्यपालांच्या कोट्यातून अझरुद्दीन यांना विधान परिषदेचे (एमएलसी) सदस्य म्हणून नामांकित करण्याचा निर्णय घेतला होता. आता त्यांना अल्पसंख्याक कल्याण खाते सोपवण्याची शक्यता आहे. अझरुद्दीन यांच्या शपथविधीसह आता राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या 16 झाली आहे. राज्यात मुख्यमंत्र्यांसह जास्तीत जास्त 18 मंत्री होऊ शकतात.
11 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ज्युबली हिल्स विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या अगदी आधी अझरुद्दीन यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. 2023 च्या निवडणुकीत त्यांच्या गृह मतदारसंघातून पराभूत झालेले 62 वर्षीय माजी क्रिकेटपटू पुन्हा निवडणूक लढवू इच्छित होते. तथापि, काँग्रेस नेतृत्वाने नवीन यादव यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचे आश्वासन देऊन त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. अझरुद्दीन यांच्या मंत्रिपदाच्या नियुक्तीला जुबली हिल्समधील सुमारे 30 टक्के मतदार असलेल्या मुस्लिमांपर्यंत पोहोचण्याचा काँग्रेस पक्षाचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न म्हणून पाहिले जाते.