महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

इटलीच्या पंतप्रधानांशी मोदींची ‘फोन पे चर्चा’

06:24 AM Apr 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारतात नवीन सरकार निवडण्यासाठी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच पंतप्रधान मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. इटलीच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मोदींनी मेलोनी आणि इटलीच्या जनतेला शुभेच्छा दिल्या. तसेच जूनमध्ये इटली येथे होणाऱ्या जी-7 शिखर परिषदेसाठी आमंत्रित केल्याबद्दल मोदींनी त्यांचे आभार मानले. दोन्ही नेत्यांनी जी-7 शिखर परिषदेत भारताच्या जी-20 अध्यक्षपदाचे महत्त्वाचे परिणाम पुढे नेण्यावर चर्चा केली. त्यांनी द्विपक्षीय धोरणात्मक भागिदारी मजबूत करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरूच्चार केला. तसेच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवर चर्चा केली, असे पंतप्रधान कार्यालयाने सांगितले. 13-15 जून 2024 रोजी इटलीमध्ये जी-7 शिखर परिषद होणार आहे. या परिषदेचे भारताला निमंत्रण मिळाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी गुरूवारी सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article